शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी सुरूच

By admin | Updated: March 17, 2016 03:08 IST

महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अद्याप जनावरांची तस्करी सुरूच असल्याचे सिद्ध झाले.

दोन ट्रक ताब्यात : पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टजवळील घटनापिंपळखुटी : महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अद्याप जनावरांची तस्करी सुरूच असल्याचे सिद्ध झाले. मागील सप्ताहात खैरी घाटात ट्रक उलटल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा अशीच घटना उघडकीस आली.ट्रकमध्ये ताडपत्रीने जनावरांना बंद करून वाहनात कोंबून नेत असताना दोन ट्रकला पिंपळखुटी आरटीओ नाक्यावर मध्यरात्री २ वाजता पकडण्यात आले. एम.पी.०९-एच.जी.३४६४ व एम.पी.०४-एच.ई.१६६८ हे दोन ट्रक पिंपळखुटी येथून जात होते. दोन्ही ट्रकने आरटीओ वजन काटा पार केला. नंतर आरटीओ एन्ट्री देण्यासाठी क्लिनर ५०० रूपयांच्या नोटा गडबडीने देत होते. त्यावरून तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्तव्यावर असलेले आरटीओ पायघन यांनी दोन्ही ट्रकची पाहणी केली, असता त्यात दोन्ही ट्रकमध्ये १०१ जनावरे आढळली.ट्रकला ताडपत्रीने बंद करून जनावरे कोंबण्यात आली होती. त्यामुळे दोन बैल व दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. पायघन यांनी लगेच पांढरकवडा पोलिसांना माहिती दिली. बुधवारी पहाटे ठाणेदार गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांच्यासोबतच घटनास्थळी बजरंग दलाचे काही कार्यकर्ते दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही ट्रक पांढरकवडा ठाण्यात जमा केले. ट्रकममधील गायी व बैल यवतमाळ येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)आंध्र प्रदेश, तेलंगणात जनावरांची होतेय निर्यातआंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात राज्यातून जनावरांची निर्यात होते. अनेकदा रात्रीच्या वेळीच विविध वाहनांतून ही जनावरे या दोन्ही राज्यात पोहोचविली जातात. आरटीओ चेकपोस्ट असल्याने अनेकदा जनावरांची वाहतूक करणारे वाहन तावडीत सापडले. त्यामुळे ही वाहने नाका चुकविण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतात. याच पद्धतीने मागील सप्ताहात एक वाहन खैरी घाटात उलटले होते. त्यात ३८ जनावरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी सय्यद शहा मजिद शहा, सादीरभाई ऊर्फ कल्लाभाई राजा आणि सादीर शेख नसरूद्दीन शेख यांना ताब्यात घेतले.