शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पारवा सेतू केंद्रात लूट

By admin | Updated: July 7, 2014 23:49 IST

विद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील

पावतीही दिली जात नाही : दाखल्यासाठी लागतात दोन दिवसअब्दुल मतीन - पारवाविद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकरीत्या लुटला जात आहे. शिवाय दाखल्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना प्रवासापोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुका महसूल प्रशासनाचेही या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका कक्षात सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियुक्त कर्मचारी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जादा शुल्क घेत आहे. यासाठीची पावतीही दिली जात नाही. सध्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांना पीककर्ज आदी कामांसाठी सातबाराची गरज आहे. या दाखल्यांसाठी शासनाने शुल्क ठरवून दिले असून तसा फलक सेतू केंद्राबाहेर लावण्याची सक्ती केली आहे. येथील सेतू केंद्राने फलक लावणे तर दूर निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेणे सुरू केले आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ८० रुपये आकारले जाते. याशिवाय इतर दाखल्यांकरिता वेगवेगळी रक्कम घेतली जात आहे. येथील सेतू केंद्रातून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी परिसराच्या २० ते २५ गावातील विद्यार्थी, नागरिक येतात. जवळपास १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून केंद्र सुरू होण्यापूर्वीच त्यांची हजेरी राहते. एकाच दिवशी दाखला मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, तसा नियमही आहे. परंतु येथील सेतू केंद्रात बहुतांश अर्जदारांना त्याच दिवशी दाखला उपलब्ध करून दिला जात नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविले जाते. याप्रकारात प्रवास भाड्याचा अतिरिक्त भुर्दंड त्यांचावर बसतो. पावसाने दडी मारल्यामुळे मजूरवर्गाच्या हाताला काम नाही. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या बहुतांश योजनाही थंड आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ पैशाची रेलचेल नाही. पाल्यांना शाळेत घालण्यासाठी दाखल्याची आवश्यकता आहे. अशावेळी त्यांना उसनवार करून रकमेची जुळवाजुळव करावी लागते. सेतू केंद्रातून मात्र या लोकांची सर्रास लूट सुरू आहे. महसूल प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.