शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

चालकांच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी वाहने होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:40 IST

दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली असणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देव्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम : एबीएस, एचएसआरपी प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली असणे बंधनकारक आहे.एबीसी प्रणालीमध्ये अ‍ॅन्टी ब्रेकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. चारचाकी वाहनांमध्ये ही प्रणाली अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. आता तिचा वापर दुचाकींमध्ये केला जात आहे. अ‍ॅन्टी ब्रेकिंग सिस्टीमध्ये अचानक करकचून ब्रेक दाबले, तरी वाहन स्लिप होण्याची भीती राहात नाही.ब्रेक पायडल कितीही पुश केला, तरी ब्रेक पॅड ड्रमला चिपकत नाही. त्यामुळे दुचाकी नियंत्रित होऊन स्लिप होण्याचा धोका जवळपास नाहिसा झाला आहे. व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये प्रवासी वाहने व नॅशनल परमिटच्या गाड्यांचा समावेश आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे ही ट्रॅकिंग सिस्टीम काम करणार आहे. वाहन कुठे आहे, त्याची गती किती, हे सर्व एका सिमकार्डच्या माध्यमातून माहीत होणार आहे. अपघातात या सिस्टीमचा ईलेक्ट्रीक पुरवठा खंडित झाल्यास आपत्कालिन स्थितीसाठी स्वतंत्र बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे इत्यंभूत माहिती मिळणार आहे.रस्त्यांची अवस्था सुधारलेली नसली तरी वाहन चालकांनी खबरदारी घेतल्यास अपघात टळू शकतात, त्यातच आता तंत्रज्ञानही त्यांच्या मदतीला राहणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.वाहन चोरी व विक्री झाली कठीणहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) विकसित केली आहे. यामुळे वाहन चोरी करून तिची नंबर प्लेट बदलविल्यानंतर ओळख पटविणे सहज शक्य होणार आहे. अनेकदा वाहन चोरून नंबर प्लेट बदलविल्यानंतर त्याची सर्रास विक्री केली जात होती. या प्रकाराला आता आळा बसणार आहे. विशेष म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट वाहनाच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. यासाठी डिलरला अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. एचएसआरपी सिस्टीममध्ये पीन नंबर असलेली नंबर प्लेट तयार होणार आहे. कोणत्या चेचीस व इंजीन नंबरला कोणती नंबर प्लेट दिली याचे रेकॉर्ड राहणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस