शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

दारू विक्रेत्यांवर झोपडपट्टीदादा कायदा लावणार

By admin | Updated: March 29, 2017 00:11 IST

वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्रेते पोलिसांना जुमानत नसल्याचे पाहून आता या दारू विक्रेत्यांवर

दोन डझनावर प्रस्ताव : मुसक्या आवळणार यवतमाळ : वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्रेते पोलिसांना जुमानत नसल्याचे पाहून आता या दारू विक्रेत्यांवर थेट झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तसे आदेश दिले आहेत. यवतमाळला लागून असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नदी-नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची निर्मिती केली जाते. शिवाय गोवा व अन्य राज्यात स्वस्तात मिळणारी दारू चोरट्या मार्गाने आणली जाते. हीच दारू दामदुप्पट भावाने विकण्यासाठी प्रतिबंधित जिल्ह्यांमध्ये पाठविली जाते. अशा दारू विक्रेत्यांवर दरवर्षी ‘ठरल्याप्रमाणे’ पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत असली तरी ती कारवाई ‘नियोजित’ राहत असल्याने त्याचा या विक्रेत्यांवर फारसा परिणाम होत नाही. अनेकदा वरिष्ठांच्या आदेशानंतर काही दिवस का होईना दारूच्या मोठ्या खेप पकडून प्रभावी कारवाई करण्याचाही प्रयत्न होतो. मात्र ती फार काळ चालत नाही. पोलिसांची ही नियमित होणारी कारवाई चिल्लर वाटत असल्याने अवैध दारू निर्माते, विक्रेते व पुरवठादार निर्ढावले आहेत. अशा निर्ढावलेल्या दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दारू विक्रेत्यांवर झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेजरस अ‍ॅक्टीव्हीटी (एमपीडीए) या कायद्यांतर्गत दारू विक्रेत्यांवर झोपडपट्टीदादाचे कलम लावून त्यांना स्थानबद्ध केले जाणार आहे. जिल्हाभरातील असे सुमारे दोन डझन दारू विक्रेते ठाणेदारांच्या निशाण्यावर आहेत. त्यांचे प्रस्ताव तयार केले जात आहे. एखाद्या दारू विक्रेत्यावर वारंवार कारवाई झाली असेल, पाच पेक्षा अधिक वेळा तो पकडला गेला असेल, तर त्याच्याविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई केली जाऊ शकते. या माध्यमातून दारूच्या तस्करीवर नियंत्रण मिळविण्याचा व विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या स्तरावर होणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाच एमपीडीएचे हे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार असून तेसुद्धा अशा कठोर कारवाईसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)