शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जिल्हा परिषद बांधकाम विभागात संथ वसुली

By admin | Updated: April 11, 2017 00:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासनाच्या सर्वच विभागात गौण खनिजाच्या रॉयल्टीची वेगवान वसुली सुरू असताना...

गौण खनिज रॉयल्टी : कंत्राटदारांचा मात्र विरोधयवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासनाच्या सर्वच विभागात गौण खनिजाच्या रॉयल्टीची वेगवान वसुली सुरू असताना जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग क्र. १ त्याला अपवाद ठरला आहे. या विभागात अतिशय संथगतीने वसुली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षभरातील विविध बांधकामांवर वापरलेल्या गौण खनिजाच्या दर तफावतीमधील रॉयल्टीचा लेखाजोखा जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीने उघड झाला. कंत्राटदारांकडून वाढीव दराने रॉयल्टी वसुली होणे बंधनकारक असताना अभियंत्यांनी ती जुन्याच दरानुसार केली. पर्यायाने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला होता. हा गंभीर प्रकार जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विविध विभागाच्या संयुक्त समित्यांद्वारे या प्रकरणांची चौकशी केली. त्या चौकशीत विविध विभागांनी कोट्यवधींचा महसूल बुडविल्याच निष्पन्न झाले. त्यात अभियंत्यांचा कंत्राटदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्याबाबतचा हलगर्जीपणाही उघड झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सर्व कामांवरील गौण खनिजाच्या रकमेतील तफावतीची रॉयल्टी वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व विभागात ही वसुली झपाट्याने सुरू आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ मध्ये अद्याप सामसूम असल्याची माहिती आहे. तेथे या रकमेची वसुली अगदीच नगन्य झाली आहे. त्यातही पांढरकवडा तालुक्याला तर जणू निल प्रमाणपत्र दिले गेले आहे. रॉयल्टीचा जुना दर २०० होता तो ४०० वर गेला. अंदाजपत्रकात ७० रुपये दर होता. शासनाच्या ५ मे २०१६ च्या परिपत्रकानुसार हा दर वाढवून १४० रुपये केला गेला. मात्र त्यानुसार वसुली झाली नाही. बांधकाम विभागात या वसुलीसाठी कार्यकारी अभियंत्याकडून जोर दिला जात नसल्याचे चित्र आहे. तर आमच्या डिपॉझिटमधून वसुली केली जाऊ नये, कराराच्यावेळी असलेला दरच कायम ठेवला जावा, यासाठी कंत्राटदारांनी कार्यकारी अभियंत्यांना साकडे घातले आहे. त्यामुळे या विभागात वसुलीचा संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले नसते तर शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला असता, एवढे निश्चित. यासाठी अभियंत्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. याला जबाबदार कोण व त्यांच्यावर कारवाई काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र.२ अंतर्गत यवतमाळपासून उमरखेडपर्यंतचे तालुके समाविष्ट आहेत. तेथेही गौण खनिज रॉयल्टीच्या तफावतीची रक्कम वसुलीचा असाच घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी कंत्राटदाराच्या सोयीने मार्ग काढण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)अभियंते जबाबदार, कारवाई केव्हा ?आता अनेक विभागातील अभियंते वसुलीच्या भानगडीत न पडता शासनाचाच निधी वळता करून रॉयल्टी वसुलीची ही खानापूर्ती करीत असल्याचीही चर्चा आहे. विशेष असे त्याला वित्त विभागातूनही सर्रास मंजुरी मिळत आहे. या माध्यमातून हे अभियंते अधिकाराचा व शासकीय निधीचा दुरुपयोग करीत आहे. बांधकाम-१ अंतर्गत येणारे यवतमाळपासून वणीपर्यंतचे कनिष्ठ, उपअभियंते या संपूर्ण बुडविलेल्या रॉयल्टीला जबाबदार मानले जातात. त्यांच्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा सन्मान म्हणून वसुली करावीच लागणार आहे आणि ती केलीही जात आहे. त्यासाठी देयके बोलविली जात आहे. मोजमाप पुस्तिका वेगवेगळ्या विभागात असल्याने त्याही गोळा केल्या जात आहे. त्यात कोणताही गैरप्रकार नसून केवळ दरातील तफावतीची रक्कम वसूल करायची आहे. शिवाय कराराच्यावेळी असलेल्या दरानुसारच वसुली व्हावी, असा कंत्राटदारांचा आग्रह आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश श्रेष्ठ मानून वसुली केली जात आहे. - आनंद राजुसकर,कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १