लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहे. यात अडथळा निर्माण करणारे वृक्ष कापले जात आहे. मात्र लिलावात घेतलेल्या झाडांपेक्षा जादा वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार महागाव ते फुलसावंगी मार्गावर आढळला आहे.रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने १३ ऑक्टोबर रोजी लिलाव घेतला. यात पुसद व महागाव तालुक्यातील २२ कंत्राटदार सहभागी झाले होते. मेट येथील कंत्राटदाराने लिलावात बाजी मारली. त्यांनी हा कंत्राट लिलावाच्या रकमपेक्षा २0 हजार जादा घेऊन पुसद येथील कंत्राटदारास विकल्याची माहिती आहे. लिलावाला उपअभियंता संतोष नाईक यांच्यासह अन्य कनिष्ठ अभियंतेही उपस्थित होते.महागाव ते फुलसावंगी मार्गाच्या दोन्ही बाजूने अडीच फूट रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. आता मार्गात अडथळा ठरणाऱ्या व लिलाव झालेल्या वृक्षांसह मालकी हक्काच्या आडजात वृक्षांवर आरी चालवली जात आहे. मालकी हक्काच्या संदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे कंत्राटदार झाडांची अवैध कत्तल करीत आहे. लिलावातील वृक्षांची कटाई करण्याऐवजी चक्क मालकी हक्काच्या वृक्षंची तोड करून कंत्राटदार कायद्याची पायमल्ली करीत आहे. वनविभागाने चौकशी करून दोषींवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.शेतकºयाने केली बांधकाम विभागाकडे तक्रारयेथील स्वराज भरवाडे या शेतकऱ्याच्या शेतातील मालकी हक्काच्या दोन सागवान झाडांची कंत्राटदाराने कत्तल केली. ते वृक्षही उचलून नेले. याबाबत भरवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाला माहिती दिली. आता ते वनविभागाकडे तक्रार करणार आहे.कंत्राटदारास दोन सागवान व ४३ आडजात, अशा एकूण ४५ वृक्ष कटाईचा परवाना दिला. त्यापेक्षा अधिक वृक्ष तोडल्यास कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत उबाळे,वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव
फुलसावंगी रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहे. यात अडथळा निर्माण करणारे वृक्ष कापले जात आहे. ...
फुलसावंगी रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल
ठळक मुद्दे४५ झाडांचा लिलाव : प्रत्यक्षात शंभरावर वृक्ष कापले, वन विभागाचे दुर्लक्ष, कंत्राटदाराची मुजोरी कायमच