शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बेपत्ता बियाणे कर्मचाऱ्याची अखेर कवटी, हाडेच सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील विशाल लॉजच्या मागील बाजूपर्यंत माग काढला. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सुनील घनबहादूर याने लॉजच्या मागील बाजूला झाडाला कापडाने गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देआत्महत्येचा संशय : पोलिसांच्या श्वानाने काढला पळसवाडीत माग

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बियाणे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी यवतमाळात उघडकीस आली. सुनील घनबहादूर रा. वरुड जऊळका ता. आकोट  जि. अकोला असे मृताचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. कवटी व हाडे सापडल्याने ही आत्महत्येची घटना उघडकीस आली.यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील विशाल लॉजच्या मागील बाजूपर्यंत माग काढला. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सुनील घनबहादूर याने लॉजच्या मागील बाजूला झाडाला कापडाने गळफास लावून आत्महत्या केली. परंतु त्याच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले. मृतेदह कुजलेला होता, गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगातील कपडेच होते, शरीराचा बहुतांश भाग कुजून खाली पडला होता. यावरून ही आत्महत्या अनेक दिवस आधी झाली असावी असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. सुनीलची पत्नी अकोला  जिल्हा पोलीस दलात लिपिक पदावर कार्यरत आहे. सुनील बियाणे कंपनीत असून तो नेहमीच विशाल लॉजमध्ये राहायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याची बॅग, वाहन लॉजमध्येच होते. मात्र त्याचा पत्ता नव्हता म्हणून लॉज मालकाने सुनीलच्या पुतण्याला याची माहिती दिली. त्यावरून पुतण्याने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून ६ नोव्हेंबरपासून सुनील बेपत्ता असल्याचे फिर्याद नोंदविली. त्याचा शोध सुरू असतानाच बुधवारी अखेर त्याच्या आत्महत्येचा उलगडा झाला. आत्महत्येच्या ठिकाणापासून श्वानांनी ही कवटी बऱ्याच दूर तोंडात धरुन आणली असावी, असा अंदाज आहे. या कवटीमुळेच सुनीलच्या आत्महत्येला वाचा फुटली. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पाेलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे, यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर आणि शहर ठाणेदार धनंजय सायरे, एलसीबीचे फौजदार सचिन पवार व पथकाने घटनास्थळी भेट दिली.

डीएनए चाचणी करणार  सुनील घनबहादूर यांच्या शरीराचे केवळ काही अवशेष पोलिसांना मिळाले. इतर पुराव्यावरून तो मृतदेह सुनीलचाच असल्याची दाट शक्यता आहे. मात्र ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे अवशेष व सुनीलच्या कुटुंबातील व्यक्तीचे नमुने घेऊन डीएनए चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच तो मृतदेह सुनीलचा असल्याचे स्पष्ट होईल, असे ठाणेदार धनंजय सायरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस