शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

तरुणाचे अपहरण करणारे सहा अटकेत

By admin | Updated: May 18, 2015 02:15 IST

जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात...

दिग्रस : जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून अपहृत तरुणाची सुखरुप सुटका करून सहा अपहरणकर्त्यांना दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांशी झालेल्या झटापटीत एक पोलीस शिपाई जखमी झाला. पोलिसांनी रिव्हॉल्वर, चाकू आणि वाहन जप्त केले आहे. दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील म.जलील या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. यासंदर्भात त्याच्या पत्नीने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दिग्रस पोलिसांनी शनिवारी एक पथक तयार केले. मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा संग्रामपूर ते जालना दरम्यान सदर वाहन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री ११ वाजतापासून २ वाजेपर्यंत या वाहनाचा पाठलाग केला. अपहृत तरुणाला काही होऊ नये म्हणून काळजी घेत अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी अपहरणकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पोलीस शिपाई मोहसीन शेख जखमी झाला. तर इतर पोलिसांनाही जबर मार लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी आशिष ईर्फ राहूल रामभाऊ वारे (२३) रा. फुलेनगर पाथरडी, राहुल बापूराव तुपे (२१) रा. बाभूळगाव ता. पाथरडी, केतन साहेबराव खाडे (२०) रा. साईबाबानगर ता. पाथरडी, हनुमान विजय परदेशी (२४) रा. साईबाबानगर, भूजंग संपतराव गर्जे (३५) रा. अकोला ता. पाथरडी, रामदास भानुदास आंधळे (३५) रा. जिल्हेवाडी जि. अहमदनगर यांना पोलिसांनी अटक केली.या आरोपींना पकडण्यासाठी ठाणेदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रेटवार, नारायण पवार, गजानन पत्रे, मोहसीन शेख, राजू पवार यांनी कारवाई केली. दिग्रस पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)