शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत मतदानाचा टक्का ३७.८० वर गेला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान नोंदविले गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींत मंगळवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. ८४ जागांसाठी सहा नगरपंचायतींत ४३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरपंचायतीत सुमारे १५ टक्क्याने मतदान वाढले असून, या वाढीव मतदानाचा कोणाला फायदा मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. निकालासाठी मात्र २९ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत मतदानाचा टक्का ३७.८० वर गेला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान नोंदविले गेले. त्यानंतर मात्र मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे शेवटच्या दोन तासांत मोठ्या संख्येने मतदान झाल्याने मतदानाचा टक्का ८० टक्क्यांवर पोहोचला. या सहा नगरपंचायतींत मागील निवडणुकांत सरासरी ६५ टक्के इतके मतदान झाले होते. त्या तुलनेत १५ टक्के मतदानात वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांनी यंदा स्वबळ आजमावल्याने निवडणुकीत चुरस वाढल्याचे दिसून आले. बहुतांश ठिकाणी कोविड नियमांचे पालन करीत नागरिक मतदान करीत होते. तर काही ठिकाणी गर्दीमुळे हे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. येथे ७७.९८ टक्के मतदान झाले आहे. राळेगाव नगरपंचायतीत ७३.७९, झरी नगरपंचायतीत ८८.३२, महागाव नगरपंचायतीत ८०.६४, मारेगाव ८०.९८, कळंब ७६.१९ तर बाभूळगाव नगरपंचायतीत ८१.७५ टक्के मतदान झाले आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीत  सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा सरासरी १५ टक्क्याने मतदान वाढले आहे.  राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२, कळंब १३ जागांसाठी ६३, महागाव १३ जागांसाठी ९१, मारेगाव १४ जागांसाठी ९०, झरी जामणी १७ जागांसाठी ८७ तर बाभूळगाव नगरपंचायतीत १३ जागांसाठी ६२ उमेदवारांनी निवडणूक लढविली.

भर थंडीत ज्येष्ठांचा उत्साह - नगरपंचायतीत काम करणारे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीही भरभरुन मतदान केले. मंगळवारी तापमान ९ अंशापर्यंत घटलेले असतानाही वयोवृद्धांनी मतदानासाठी कडाक्याच्या थंडीत मतदान केंद्र गाठले होते. शहरात विकास कामे व्हावी यासाठी त्यांची धडपड दिसली. 

अत्यल्प लोकसंख्या असलेल्या झरी नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. येथील निवडणूक अत्यंत अटी-तटीची ठरली. सहाही नगरपंचायतींकरिता झालेल्या मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे. 

महागावात दोन गट आले होते आमनेसामने - महागावच्या प्रभाग क्र. ८ करिता बचत भवनात मतदान सुरू असताना एका गटाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटाकडून त्याबाबत आक्षेप घेतला गेला. त्यावरून केंद्राच्या गेटवरच दाेन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. व्यंकट राठोड यांनी पोलीस बंदोबस्त वाढविल्याने वाद निवळला. ठाणेदार विलास चव्हाण, उमेश भोसले यांनी हस्तक्षेप करून मतदान केंद्रावर शांतता प्रस्थापित केली.  

 

टॅग्स :Electionनिवडणूक