दारव्हा तालुका : सभापती, उपसभापतींनाही आता शोध मतदारसंघाचादारव्हा : पंचायत समितीच्या आरक्षाणानंतर विद्यमान सभापती, उपसभापती व चार सदस्य मतदारसंघाविना झाले आहेत. त्यांना मतदारसंघ शोधण्याची वेळ आली.विद्यमान सभापती उज्वलाताई बनसोड यांचा वडगाव गाढवे गण यावेळी अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला आहे. उपसभापती प्रा.सुषमा गावंडे यांचा बोरी गण यावेळी अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. तसेच माजी सभापती व विद्यमान सदस्या शालूताई लोखंडे यांचा डोल्हारी गण नामाप्रकरिता राखीव झाला आहे. सदस्य विठोबा कसंबे यांचा लाडखेड गण यावेळी नामाप्र स्त्रीकरिता आरक्षित झाला आहे. तसेच निळकंठ ठाकरे यांचा भांडेगाव गण सामान्य स्त्रीकरिता राखीव झाला आहे. तसेच माणिक राठोड यांचे तळेगाव गणही सामान्य स्त्रीकरिता राखीव झाल्याने या सहा सदस्यांना मतदारसंघाविना राहण्याची पाळी आली आहे. लोही, महागाव, सायखेडा व चिखली या चार गणांमधील अनुक्रमे उमाताई ठक, चरण पवार, जयश्री मिरासे व बेबीताई चव्हाण यांना यावेळी निवडणूक लढण्याची संधी आहे. येथील बचत भवनात उपविभागीय अधिकारी तथा निरीक्षण अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार प्रकाश राऊत, नायब तहसीलदार विनोद हरणे, नायब तहसीलदार मधुकर खडसे यांनी आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला प्रक्रियेत चुका असल्याची बाब जि.प. सदस्य अमोल राठोड यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. उपस्थितांच्या शंकांचे अधिकाऱ्यांनी समाधान केले. (प्रतिनिधी)राळेगावात जळका नवीन गणराळेगाव : राळेगाव तालुक्यात जळका या नवीन गणाची निर्मिती झाली आहे. हा गण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे. बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणात धानोरा नामाप्र स्त्री, झाडगाव सर्वसाधारण, वरध अनुसूचित जमाती, वाढोणाबाजार नागरिकांचा मागास प्रवर्ग, वडकी सामान्य स्त्री असे आरक्षण निघाले आहे. निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार उपस्थित होते. पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर केली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षण ठरविण्याची पद्धत, ग्रामीण भागाची लोकसंख्या, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या, २००२, २००७, २०१२ मध्ये राहिलेले आरक्षण व चक्राकार पद्धतीने येणारे आरक्षण याची माहिती उपस्थितांना पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशननुसार देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)नेरमध्ये प्रस्थापितांची संधी हुकलीनेर : नेर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट व गणांचे आरक्षण बुधवारी काढण्यात आले. या आरक्षणामुळे प्रस्थापितांना पुन्हा संधी हुकली आहे. हक्काचा गट आणि गण इतर प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना इतर ठिकाणाचा शोध घ्यावा लागत आहे. अडगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण, वटफळी सर्वसाधारण महिला, मांगलादेवी अनुसूचित जाती, सोनवाढोणा सर्वसाधारण महिला, मालखेड नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर चिकणी डोमगा गण नामाप्र महिलासाठी राखीव निघाला आहे. (तालुका प्रतिनिधी)बाभूळगावमध्ये अनेकांचा हिरमोडबाभूळगाव : बाभूळगाव पंचायत समिती गणाची सोडत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. सोडती नंतर अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसत होते. गेल्या अनेक महिन्यापासून या सोडतीकडे राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून होते. बाभूळगाव पंचायत समितीमध्ये सहा जागा होत्या. बाभूळगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर या जागा चार झाल्या तर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या तीन वरून कमी करून दोन केल्या गेली. सोडतील घारफळ गण अनुसूचित जाती, वेणी गण सर्वसाधारण, पहूर गणअनुसूचित जमाती महिला तर सावर गण नामाप्र महिलेसाठी आरक्षित करण्यात आला. आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी महादेवराव खेडकर, तहसीलदार दिलीप झाडे, नायब तहसीलदार आय.एम. कांबळे व मंडळ अधिकारी प्रफुल घोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (प्रतिनिधी)
सहा सदस्य मतदारसंघाविना
By admin | Updated: October 6, 2016 00:15 IST