शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:36 IST

Yawatmal News farmer दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

ठळक मुद्देदसऱ्याचा मुहूर्त टळला, आता दिवाळीवर नजरा 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अतिवृष्टी व पुरामुळे पशिचम  विदर्भातील सहा लाख शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अमरावती विभागात चार लाख ७५ हजार ९९ हेक्टरमधील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या प्रमुख पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. सहा लाख आठ हजार ५३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यावरून शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी ३४० कोटी २५ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. या नुकसानीचा अहवाल अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी २० सप्टेंबरला शासनाला सादर केला. त्यानंतर दोनच दिवसात अर्थात दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, अशी घोषणा सरकारने केली होती.  प्रत्यक्षात आजतागायत ही रक्कम जमा झाली नाही. किमान आता दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप त्या संबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही.

सोलापूर, उस्मानाबादमुळे जीआर रखडला ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे वेगळे सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूर व उस्मानाबाद  जिल्ह्यातील नुकसानीचे अहवाल शासनाला अद्याप प्राप्त न झाल्याने मदत वाटपासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात अडचण  निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले्ल्या जिरायती शेतीला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, बागायती शेतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागांना हेक्टरी १८ हजारांची मदत दिली जाते.

एकाच दिवशी ६५ मिमी पावसाच्या निकषाचा फटका शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यात अवघ्या ३४० कोटींचे नुकसान दाखविले गेले असले तरी प्रत्यक्षात हे नुकसान किती तरी अधिक आहे.  अतिवृष्टीत या नुकसानीसाठी एकाच दिवशी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस हा निकष लावला जातो. परंतु प्रत्यक्षात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या निकषामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ठिकाणांचे पंचनामेही करण्याची मागणी होत आहे.जून ते सप्टेंबर या काळात पूर, पाऊस व अतिवृष्टीमुळे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्याला एकच वेळा नुकसान भरपाई दिली जाते. गाव आणि शेतकरी बदलला तरच नवे नावे यादीत समाविष्ट केले जाते. शासनाकडून लवकरच मदत वाटपाचा आदेश जारी होण्याची प्रतीक्षा आहे. - सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती