शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सहा तास सलग वीज कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 01:45 IST

शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले.

जनतेत रोष : झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली वीज गुलयवतमाळ : शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कृषिपंपावर १६ तासांऐवजी १८ तासांचे भारनियमन लादण्यात आले. प्रत्यक्षात सलग वीज पुरवठा झालाच नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. झिरो लोडशेडींगच्या नावाखाली सहा तासांमध्ये चार तास वीज गुल होत आहे. यामुळे रब्बी अखेरपर्यंत पोहोचणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वीज वितरण कंपनीने कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वीत केले. यावरून वीज पुरवठा करण्यात येतो. पूर्वी आठ तास वीज दिली जात होती. मात्र ती कागदावरच होती. या आठ तासात वारंवार वीज खंडीत होत होती. यामुळे दिवसभरात दोन तास वीज मिळणेही कठीण होते.यावर मात करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि वीज वितरण कंपनीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये आठ तासाऐवजी सलग सहा तास वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार वीज कंपनीने वेळापत्रकही जाहीर केले.यामध्ये तीन दिवस मध्यरात्री १२ ते ६ पर्यंत, तर पुढील तीन दिवस पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिवसा वीज पुरवठा करताना ६ तासांमध्ये ४ तास वीज गायब राहीली. पूर्वीप्रमाणे दोन तासही वीज मिळत नाही. वेळापत्रक बदलविल्यानंतरही कृषिपंपावरील विजेचा प्रश्न सुटला नाही. तो जसाच्या तसाच आहे. उलट शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहे. यामुळे ओलित करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीचे उद्दिष्ट पूर्ण होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी सिंचन करण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यांना वीज मिळत नाही. यामुळे ओलित करणे अवघड झाले आहे. यातून कृषी क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने निदान स्वत:चेच वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. (शहर वार्ताहर)