शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

७५ कोटींच्या बांधकामात सहा कोटी रॉयल्टी बुडविली

By admin | Updated: March 29, 2017 00:20 IST

जिल्ह्यातील अभियांत्रिकी रोजगार व स्वयंरोजगार सहकारी संस्थांनी तीन वर्षात ७५ कोटींची बांधकामे

अभियांत्रिकी रोजगार संस्था : चौकशीपासून कोसोदूर का? यवतमाळ : जिल्ह्यातील अभियांत्रिकी रोजगार व स्वयंरोजगार सहकारी संस्थांनी तीन वर्षात ७५ कोटींची बांधकामे करताना त्यावरील सहा कोटी रुपयांची रॉयल्टी बुडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने लक्ष केंद्रीत केल्यास कामांसाठी पात्र ठरलेल्या २० अभियांत्रिकी संस्था वसुलीच्या कक्षेत येण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागते. हे गौण खनिज रितसर शासनाकडे रॉयल्टी भरुन आणलेले असणे गरजेचे आहेत. परंतु अनेक कंत्राटदार कागदोपत्रीच ही रॉयल्टी दाखवून त्याच्या खोट्या पावत्या देयकासोबत सादर करतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा अनेक कंत्राटदारांचा पर्दाफाश केला आहे. परंतु अभियांत्रिकी रोजगार व स्वयंरोजगार सहकारी संस्था यातून सुटल्याचे दिसून येते. सुशिक्षित बेरोजगार संस्थांना बांधकामांमध्ये ३३ टक्के कोटा असतो. यातील दहा टक्के कामे ही अभियांत्रिकी रोजगार संस्थेला दिली जातात. सन २००९-१० ते २०१२-१३ या तीन वर्षात अभियांत्रिकी रोजगाराच्या २० संस्था कामे मिळविण्यासाठी पात्र ठरल्या होत्या. तीन वर्षात या संस्थांनी ७५ कोटी रुपयांची कामे केली. परंतु त्यापोटी आठ टक्के दराने रॉयल्टी भरली गेली नाही. सुमारे सहा कोटी रुपयांची शासनाची रॉयल्टी बुडविली गेली. मात्र ती कागदावर दाखविण्यासाठी गौण खनिज रॉयल्टीच्या खोट्या पावत्या शासनाच्या विविध विभागांना देयकांसोबत सादर केल्या गेल्या आहेत. २० पैकी काही संस्थांनी लागेबांधे करून कोट्यवधी रुपयांची कामे मिळविली. या संस्थांच्या एका पदाधिकाऱ्याच्या दोन संस्था आहेत. पुसदमधील एक व दिग्रसमधील दोन संस्थांनी सर्वाधिक कामे केली आहेत. महसूल विभागाच्या कनिष्ठ यंत्रणेला मॅनेज करून या कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकामांवर गिट्टा, गिट्टी, मुरुम, रेती आदी गौण खनिज मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या आणून वापरले. त्यात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संस्थांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन पदाधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनाही मॅनेज केले होते. (जिल्हा प्रतिनिधी) संस्थांचे आॅडिटही केले नाही अभियांत्रिकी रोजगार व स्वयंरोजगार संस्थांनी तीन वर्षात ७५ कोटींची कामे केली असताना प्राप्तीकर विभागाच्या दप्तरी रिटर्नच्या माध्यमातून ते दाखविण्याची तसदी घेतली नाही. प्राप्तीकर, विक्रीकर दडपण्याच्या दृष्टीने आॅडिटच केले गेले नसल्याचे सांगितले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या अभियांत्रिकी सहकारी संस्थांचा गेल्या काही वर्षातील कारभार व उलाढाल तपासल्यास मोठे घबाड उघड होण्याची शक्यता आहे.