शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

उघड्यावर बसले अन् फसले

By admin | Updated: January 8, 2016 03:18 IST

तालुक्यातील मादणी गावात बाभूळगावचे गुड मॉर्निंग पथक धडकताच त्यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ जणांना पकडले.

५६ जणांवर कारवाई : मादणीतील यादी पोलिसांकडे सादरबाभूळगाव : तालुक्यातील मादणी गावात बाभूळगावचे गुड मॉर्निंग पथक धडकताच त्यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ जणांना पकडले. या ५६ जणांची यादी पोलीस विभागाला सादर केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण बाभूळगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी २० डिसेंबरला तालुक्यात पदयात्रा काढली होती. शौचालय बांधण्याचा संदेश गावोगावी देण्यात आला. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गाव व पंचायत समितीस्तरावर गुड मॉर्निंग पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाद्वारे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम मादणी गावातून सुरू करण्यात आली. ६ जानेवारीला पंचायत समितीस्तरावरील पथकाने पहाटे ४ वाजता मादणी गावाला अचानक भेट दिली. यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ लोकांवर कारवाई करण्याबाबतची यादी बाभूळगाव पोलीस ठाण्याला सादर करण्यात आली आहे. मुंबई पोलीस अधिनियम कलम ११५ व ११७ नुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर १२०० रुपये दंड व न्यायालयीन कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी त्वरित शौचालय बांधकाम सुरू करण्याचे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे. गावातील दोन नागरिक नरेंद्र दहीफळे व महादेव मरापे यांनी आपल्या घरी शौचालय बांधकामाचा शुभारंभ उपसरपंच सुनील मते यांच्या हस्ते केला. यावेळी गटविकास अधिकारी राजीव फडके, सहायक गटविकास अधिकारी रमेश दाडके, विस्तार अधिकारी पोपळकर, जारंडे, जांभुळे, टेंभुर्णे, आरोग्यसेवक विजय बुटके, शिक्षक डी.डी. डेबरे, रवी नागरेकर, एल.एच. धुर्वे, अंगणवाडी पर्यवेक्षिका गजबे, केंद्र प्रमुख संजय पोकळे, अंगणवाडी सेविका, आशा बचतगट प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुड मॉर्निंग पथकाचा दररोज दणकागुड मॉर्निंग पथक दररोज एक ते दोन गावांमध्ये आकस्मिक भेट देणार आहे. या मोहिमेला पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले आहे. बाभूळगाव तालुक्यातील इतरही गावातील नागरिकांनी उघड्यावर शौचास जावू नये, घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.