शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एकच नारा, तंबाखूमुक्त जिल्हा सारा

By admin | Updated: January 1, 2016 03:46 IST

राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तंबाखूमुक्तीचा रथ खऱ्या अर्थाने

संकल्प दिन : १५ हजार मान्यवर, ४५ हजार पालकांसह ४ लाख मुखांतून वदवली शपथयवतमाळ : राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तंबाखूमुक्तीचा रथ खऱ्या अर्थाने पुढे नेला. गुरूवारी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांत झालेल्या संकल्प दिनात तब्बल ४ लाख ३० हजार नागरिकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. नव्या वर्षाचे स्वागत करताना शिक्षण विभागाने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ७ जुलैला राज्य शासनानेही शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेने त्याही पुढे जात शाळांसह संपूर्ण गावच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर हा ‘तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संकल्प दिन साजरा करण्यात आला. सकाळी ११ ते १२ या एका तासाच्या निश्चित कालावधी मध्ये प्रत्येक ठिकाणी तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. गोदणी रोडवरील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा) गुरुवारी सकाळी ११ वाजता संकल्प दिनाचा मुख्य सोहळा झाला. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाजकल्याण सभापती लता खांदवे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले, दीपक पाटील, अवधुत वानखडे, चंद्रमणी घायवटे, सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलाणकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. येथे उपस्थित असलेल्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुकात होण्याची दाट शक्यता आहे, असे यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशनचे पिलाणकर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले. जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये जवळपास ४ लाख ३० हजार लोकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. यात १५ हजार मान्यवरांनी तर ४५ हजार पालकांनीही शपथ घेतली. त्यामुळे लिम्का बुकात या उपक्रमाची नोंद होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती तंबाखूमुक्ती चळवळीचे जिल्हा समन्वयक अवधुत वानखडे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)सर, छातीवर हात ठेवून शपथ घ्या !४‘‘आता एकच नारा तंबाखूमुक्त जिल्हा सारा’’ असा नारा गावागावांत गुंजला. तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आग्रहपत्राला प्रतिसाद देत प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुडाणा, निंभा येथील शाळांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. निंभा येथील शाळेत तंबाखूमुक्ती शपथ घेण्यासाठी सर्वजन जमलेले असताना पन्नाशीतील लक्ष्मण पवार हा ग्रामस्थ धडकला. कोणतेही व्यसन मनाशी संबंधित असते, असे सांगत त्यांनी शिक्षकांना ‘‘सर, तंबाखू सोडण्यासाठी छातीवर हात ठेवून शपथ घ्या’’ अशी सूचना केली. त्यानंतर कार्यक्रमात किंचित बदल करीत हात पुढे करण्याऐवजी हृदयावर ठेवून सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.