शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातील शुल्कवाढीचा असाही निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:07 IST

आता न्यायही महागला असून राज्य शासनाच्या निर्णयाने विविध स्वरूपांच्या शुल्कामध्ये दुप्पटीपेक्षा अधिकची वाढ झाली.

ठळक मुद्देअच्छे दिन आये है, कोर्ट फी मे इजाफा हो गया : उपरोधिक फलकाने वेधले लक्ष, दुपटीने वाढ

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आता न्यायही महागला असून राज्य शासनाच्या निर्णयाने विविध स्वरूपांच्या शुल्कामध्ये दुप्पटीपेक्षा अधिकची वाढ झाली. त्याचा एका ज्येष्ठ विधिज्ञाने जिल्हा न्यायालयात ‘अच्छे दिन आले’ अशा स्वरूपात मजकूर लिहून आगळावेगळा निषेध केला.न्यायालयीन कामकाजासाठी १९९८ च्या कायद्यानुसार शुल्क आकारले जात होते. राज्य शासनाने या कायद्यात १६ जानेवारी २०१८ पासून फेरबदल करून शुल्कात मोठी वाढ केली. पूर्वी तारीख बदलविण्यासाठी दहा रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागत. आता ५० रुपये मोजावे लागणार आहे. वकीलपत्रासाठी दहा रुपयांऐवजी ३० रुपये द्यावे लागतील. कोर्टातून कागदपत्राची प्रत मिळविण्यासाठी आता चारऐवजी २० रुपये द्यावे लागतील. दावा दाखल करताना पूर्वी तीन लाख रुपयांपर्यंत कोर्ट फी आकारली जात होती. आता त्यात दहा लाखांपर्यंत वाढ झाली आहे.या निर्णयाचा न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या शुभेच्छा फलकावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला गेला. एका ज्येष्ठ विधिज्ञाने फलकावर ‘अच्छे दिन आये है’ कोर्ट फी मे इजाफा हो गया. वकील पत्र रुपये २०, तारीख रुपये ५०, और सब जानलेवा गरीब के लिये अदालत नही है. अधिवक्ता परिषद सोयी है. बार कौन्सिल कुछ करे. अशा शब्दात शुल्क वाढीमुळे निर्माण होणाºया समस्येचे वर्णन केले. तसेच गरिबांपुढील अडचणींवर अधिवक्ता परिषद स्तब्ध का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.घटनेनुसार न्याय हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी शुल्कच आकारू नये. आता या शुल्कात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ केली. सरकार लुटतयं, शेतकरी तुटतोय अशी स्थिती आहे. न्यायालयात संपत्तीचे गाºहाणे शेतकरीच अधिक मांडतात.- अ‍ॅड.बबनराव बिबेकरज्येष्ठ विधिज्ञ, यवतमाळशुल्क वाढीने गोरगरीबांसाठी न्याय महाग झाला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी व नव्याने दावे दाखल करणारे शेतकरी यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- अ‍ॅड.रवींद्र अलोणेसदस्य, जिल्हा वकील संघ