शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुक्यांमध्ये उलथापालथीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आहेत; मात्र नेमके कोणत्या तालुक्यात गट आणि गण वाढणार याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही आले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार नव्याने वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण वाढणार आहेत. यात जिल्ह्यात आठ गट आणि १६ गणांची भर पडणार आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान आठ तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आहेत; मात्र नेमके कोणत्या तालुक्यात गट आणि गण वाढणार याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही आले नाहीत. त्यामुळे गट आणि गण वाढीचा गुंता अद्याप कायम आहे. तथापि, आठ तालुक्यांमध्ये निश्चितच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विद्यमान सदस्यांची मुदत येत्या मार्चमध्ये संपणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र गट आणि गणांच्या निर्मितीनंतरच ही निवडणूक होणार आहे. तसेच गट आणि गणांसाठी तत्पूर्वीच आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या नजरा नवीन गट व गण निर्मितीकडे लागल्या आहेत. त्यांना आरक्षणाचीही प्रतीक्षा आहे. नवीन गट आणि गण रचण्याची इच्छूकांना उत्सुकता लागली आहे. त्यावरच त्यांचे सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. विशेषत: संबंधित आठ तालुक्यांमधील इच्छुकांची प्रतीक्षा ताणली जात आहे. 

या तालुक्यांमध्ये बिघडणार गणितजिल्ह्यात पुसद, उमरखेड, महागाव, वणी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक गट आणि गण आहेत. या तालुक्यांची लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळे या चार तालुक्यांमध्ये निश्चितच प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय दिग्रस, घाटंजी, झरी, बाभूळगाव आणि यवतमाळ यापैकी चार तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढण्याची शक्यता आहे. 

जुन्या गट-गणांची मोडतोडनवीन गट आणि गण निर्मितीसाठी संबंधित तालुक्यात जुन्या गट आणि गणांची मोडतोड होण्याची शक्यता आहे. त्या तालुक्यातील गट आणि गणांची नव्याने निर्मिती होण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या गट आणि गणात असलेली गावे नवीन गट व गणात जाण्याची शक्यता आहे. संबंधित तालुक्यातील सर्वच गट आणि गणांची मोडतोड होऊन नवीन गट निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद