शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:26 IST

जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले.

ठळक मुद्दे१ मे रोजी सन्मान : महासंचालकांचे प्रशस्तिपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले. त्याबद्दल पोलीस महासंचालकांकडूनही त्यांचा गौरव केला जाणार आहे.पोलीस दलात सलग १५ वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची व इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची या सन्मानचिन्हासाठी निवड केली जाते. पोलीस दलात गौरवाचे असलेले हे सन्मानचिन्ह जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश लक्ष्मणराव इंगळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक संजीव महादेव नागे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पुंडलिकराव राऊत, विलास गोपाळराव मडघे, हरिदास गोविंदराव महल्ले, रविकांत पांडुरंग बदकी, जमादार गजानन कृष्णाजी मडावी, ज्ञानेश्वर नामदेवराव शेंडे, अरुण रामरावजी नाकतोडे, दिलीप कनिराम राठोड, श्यामसुंदर तुळशीराम निंबेकर, सुधाकर गोविंदराव मेश्राम या सहा जणांची निवड झाली आहे. पोलीस नाईक सैयद साजीद सैयद हाशम, संतोष बाबूराव वेट्टी, उमेश रमेशराव गटलेवार या तिघांची महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड झाली. या सर्वांना १ मे रोजी सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र पोलीस मुख्यालयातील संचलन मैदानावर आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक दिले जाणार आहे.एसपींचा गौरवयवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता या प्रशंसनीय कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना घोषित झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकाचवेळी १६ पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस