शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शटरने दगा दिला अन् एजंट आगीत होरपळला

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

गैरव्यवहार दडपण्यासाठी पतसंस्थेलाच आग लावण्याचा कट रचला, ही आग शॉर्टसर्किट दाखविण्याचा मनसुबा होता. मात्र आग लावण्यासाठी पतसंस्थेत गेलेल्या एजंटाचा मनसुबा ऐनवेळी अचानक लॉक

नेरच्या महिला क्रेडीट को.आॅप. सोसायटीतील कट उघडकीस नेर : गैरव्यवहार दडपण्यासाठी पतसंस्थेलाच आग लावण्याचा कट रचला, ही आग शॉर्टसर्किट दाखविण्याचा मनसुबा होता. मात्र आग लावण्यासाठी पतसंस्थेत गेलेल्या एजंटाचा मनसुबा ऐनवेळी अचानक लॉक झालेल्या इमारतीच्या शटरने उधळला. एजंटाने बँकेतील कागदपत्रांना आग लावली खरी मात्र त्याला तेथून बाहेरच पडता आले नाही. स्वत:च लावलेल्या आगीत हा एजंटही ३२ टक्के जळाला. पोलिसांना रंगेहात सापडलेल्या या एजंटानेच आता आगीच्या या घटनेमागील बिंग फोडले आणि या कटात सहभागी इतरांची नावेही उघड केली. महिला अर्बन को.आॅप. क्रेडीट सोसायटी मर्यादित नेरमध्ये ही घटना घडली. नेर पोलीस ठाण्याच्या अगदी समोर शाम सव्वालाखे यांच्या इमारतीत पहिल्या माळ्यावर सदर महिला अर्बन को.आॅप. पतसंस्था आहे. रात्री ३ वाजताच्या सुमारास या बँकेला आग लागली. आतून वाचवा वाचवा असा आवाज आल्याने पोलीस ठाण्यात ड्युटीवर तैनात जमादार हरिशचंद्र कार आणि शिपाई लक्ष्मण राऊत हे तेथे पोहोचले. यावेळी बँकेचे शटर बंद होते. अथक प्रयत्न करून शटर उघडण्यात आले. जळालेल्या अवस्थेत एजंट रवींद्र भोयर याला बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये बँकेचे फर्निचर आणि दस्ताऐवज जळून खाक झाले. त्यात तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यावेळी तिजोरीतील ५२ हजाराची रोकड, ११६ कोरे चेक व दोन बाँड सुरक्षित राहिले. एजंट भोयर रात्री ३ वाजता एम.एच.-२९-वाय-१३४६ या होंडा शाहीन गाडीने घटनास्थळी दाखल झाला. त्याने आपली दुचाकी एका गल्लीत ठेवली. आपल्या जवळच्या चाबीने बँकेचे कुलूप उघडले व नंतर शटर लावून घेतले. बँकेतील सर्व दस्ताऐवज मधात ठेऊन त्याने पेट्रोल टाकून ते पेटविले. यावेळी पेट्रोलचा अचानक भडका झाला. भोयरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेवर शटर उघडले नाही. अखेर स्वत: लावलेल्या या आगीत तो स्वत:च ३२ टक्के भाजला. मदतीसाठी पोलीस धावून आल्याने त्याचे प्राण वाचले. डेली वसुली एजंट भोयरने बँकेला आग नेमकी का लावली, याबाबत वेगवेगळी कारणे पुढे येत आहे. एजंट रवींद्र भोयर याने बयानात सांगितले की, आगीच्या या घटनेत बँकेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण आणि शिपाई विलास पोहणकर यांचा सहभाग आहे. रवींद्रच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, बँक जाळण्याबाबत रात्री आपल्या पतीला फोनवरून सूचना देण्यात आली होती. तर चपराशी विलास पोहणकर याने सांगितले की, रात्री माझी चाबी हरविली. त्याबाबत घरी गेल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे मी एजंट भोयरला फोन केला. त्याने ही चाबी शोधली आणि आगीची घटना घडली. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवर केलेल्या तपासात चपराशी पोहणकर व एजंट भोयर यांचे रात्री १२ ते १ दरम्यान अनेकदा संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. व्यवस्थापक चव्हाण यांनी भोयरला काल सायंकाळी त्याच्याकडील वसुलीचे पावती बुक तपासण्यासाठी आणण्यास सांगितले होते. त्यानंतर ही घटना घडली. नेर पोलीस ठाण्यात भादंवि ४३६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात बँकेचा एजंट रवींद्र रामभाऊ भोयर (३०) रा. छत्रपतीनगर नेर, शिपाई विलास पोहणकर या दोघांना आरोपी बनविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)