शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात पहिल्याच दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या भयाने नागरिकांनी पाळला कडकडीत बंद, वर्दळीच्या रस्त्यांवर स्मशानशांतता

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढताच, जिल्हा प्रशासनाने २५ ते ३१ जुलैैपर्यंत येथे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी पहिल्या दिवशी पांढरकवडा शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. नागरिकही घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे दिवसभर रस्त्यावर स्मशानशांतता दिसून आली.२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.मागील पंधरा दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैैकी तब्बल ३४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यातच एका व्यक्तीचाही कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पांढरकवडा शहराची चिंता वाढली आहे. केवळ दोन दिवसांत शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कारोनाची साखळी मोठी आहे. ती तोडल्या गेली नाही, तर पांढरकवडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागालादेखील त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून पांढरकवडा शहरावर कोरोनाचे सावट होते. सुरूवातीचा लॉकडाऊन आणि जनतेने घेतलेली खबरदारी यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ९ जुलै रोजी मधप्रदेशातून एक व्यक्ती पांढरकवडा येथे त्याच्या घरी परत आली. त्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पोसिटीव्ह आला. तेथूनच कोरोनाची साखळी तयार झाली.पोलिसांचा खडा पहारापांढरकवडा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला. अत्यावश्यक सेवेत मोडणारी औषध विक्रीची दुकाने, दवाखाने व दूध विक्री वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत. त्यानुसार, पांढरकवडा पोलिसांनी शहरातील महत्वाच्या चौकात खडा पहारा देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले. अकारण घराबाहेर पडणाऱ्यांना घरातच थांबण्याचे आवाहन यावेळी पोलीस करीत होते.मस्जिद वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉटपांढरकवडा शहरातील मस्जीद वॉर्डातील एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले, तेव्हा मृत व्यक्तीच्या संपर्कातील सर्वाधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मस्जिद वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे या परिसरात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. प्रशासनाकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या