शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: April 18, 2017 00:02 IST

जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती.

रूपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील ३४२ तलाव कोरडे पडले. तर चार लघु प्रकल्पातही ठणठणाट निर्माण झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागही अवाक झाला आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत वृद्धिंगत करण्यात आले. पावसाचे पाणी संचित करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले. मात्र हा जलसाठा अधिक काळ टिकला नाही. यातून जिल्ह्यात पाणी टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ६९ सिंचन तलाव आहेत. यात २९ हजार ६२५ टीसीएम पाणी साठा होतो. आता ३५ तलाव कोरडे पडले असून ३४ तलावामध्ये २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात २५० पाझर तलाव आहेत. यात ६३ हजार ५९८ टीसीएम जलसाठा होता. आता २०० तलाव कोरडे पडले आहे. ५० तलावात १५ टक्के पाणी आहे. ५ साठवण तलावात ९५२ टीसीएम पाणी साठा होतो. दोन तलावात केवळ २० टक्के पाणी आहे. ५५ गाव तलावांची क्षमता पाच हजार ३४८ टीसीएमची आहे. हे तलाव कोरडे पडले आहे. ५० ब्रिटीशकालीन तलावाची सिंचन क्षमता चार हजार ६९६ टीसीएम असून सर्व तलाव सध्या कोरडे पडले आहेत. अशीच अवस्था पाटबंधारे विभागातील सिंचन तलावांची आहे. हे प्रकल्प पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाले होते. आता या प्रकल्पात सरासरी २९.३७ टक्के पाणी आहे. गत सात महिन्यात प्रकल्पातील ७१ टक्के पाणी रिकामे झाले. तर अनेक लघु प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. ६२ पैकी चार लघु प्रकल्प कोेरडे पडले आहेत. यामध्ये नेर, रूई, किन्ही आणि बोरडा प्रकल्पाचा समावेश आहे. मोठ्या पूस प्रकल्पात ३०.२१ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ३४.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पात केवळ २१ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे.