शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
2
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
3
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
4
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
5
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
6
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
7
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
8
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
9
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
10
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
11
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
12
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
13
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
14
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
15
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
16
ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही
17
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
18
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
19
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
20
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट

श्रावणबाळ ! कुणीही या, अनुदान घ्या!

By admin | Updated: November 18, 2015 02:37 IST

निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.

यवतमाळ : निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थी शासकीय निधी लाटत असून तब्बल साडेचार हजार लाभार्थ्यांची कागदपत्रेच प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र, या साडेचार हजार लोकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आयुष्यच्या उत्तरार्धात आधार मिळावा म्हणून श्रावणबाळ योजना राबविली जाते. तालुकास्तरावर नेमल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना समितीकडून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र, आर्णी तालुक्याच्या समितीने अनेक अपात्र लाभार्थ्यांची निवड केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नोंदविलेले निरीक्षण गंभीर आहे. आर्णी तालुक्यात श्रावणबाळ योजनेत ७ हजार ४८५ लाभार्थ्यांना दर महिन्याला अनुदान दिले जात आहे. मात्र, यातील तब्बल ४ हजार ५५४ लाभार्थ्यांची प्रकरणेच तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. केवळ २ हजार ९३१ प्रकरणे उपलब्ध आहेत. मात्र साडेहजार लाभार्थ्यांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगणारे प्रशासन या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करीत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच संजय गांधी निराधार योजना विभागाकडे आर्णी तहसीलदारांचे दुर्लक्ष असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले आहे. आर्णी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष ज्या शेंदूरसनी गावातील आहेत, त्याच गावातील लाभार्थ्यांबाबत गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. येथील पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना लाभ दिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. समितीची २० आॅगस्ट २०१४ रोजी झालेली बैठकही संशयाच्या भोवऱ्यात आहे. या बैठकीत मंजुरीसाठी श्रावणबाळ योजनेची ४१२ प्रकरणे आली. मात्र, बैठकीत मंजूर यादीतील लाभार्थ्यांची संख्या ४२३ आहे. काही लाभार्थी समितीने मनमानी पद्धतीने यादीत घुसडल्याची शक्यता आहे. बैठकीच्या इतिवृत्त लिहिताना मंजूर आणि नामंजूर अर्जांच्या संख्येचा रकाना कोरा ठेवण्यात आला. बैठकीनंतर लाभार्थ्यांची यादी मनमानीपणे फिरविण्यासाठी वाव असावा म्हणूनच हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक लाभार्थ्यांचे वय अधिक दाखविण्यात आले, शेती असलेल्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आला, काही जणांचे उत्पन्नाचे दाखले संशयास्पद आहे. आणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेंदूरसनीचे आहेत. याच गावातील रमाकांत कोल्हे यांनी माहिती अधिकारातून पात्र-अपात्र लाभार्थ्यांची माहिती उघड केली आहे. तर रमाकांत कोल्हे आणि कुणाल आठवले यांनी या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पाठपुरावा चालविला आहे. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना दाद मिळत नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही आर्णी तहसीलकडून चौकशी करण्यात आलेली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)