शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 18:51 IST

उमरखेडमध्ये घेराव : हिवराच्या ग्रामसेवकाला शो-कॉज

यवतमाळ : विधीमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी पाच वेगवेगळ्या गटात जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी आदींना भेटी देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. उमरखेड येथे उमेदच्या महिलांनी समिती सदस्यांना घेराव घातला तर महागाव तालुक्यातील हिवरासंगमच्या ग्रामसेवकाला समितीने शो-कॉज नोटीस बजावली. 

आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील एकूण १५ सदस्यांची पंचायतराज समिती मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीईओंची साक्ष नोंदविली. त्यानंतर बुधवारी समितीने पाच वेगवेगळे गट करून विविध पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा, अंगणवाडींना भेटी दिल्या. वणी, आर्णी, मारेगाव, नेर, कळंब, घाटंजी, उमरखेड, महागाव, दारव्हा, पांढरकवडा आदी पंचायत समितींना भेटीदेऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला. उमरखेड येथे समिती सदस्य आमदार कैलास पाटील, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर यांंना घेराव घालून उमेदकडून ना उमेद झालेल्या महिलांनी निवेदन दिले. महागाव तालुक्यात हिवरासंगम येथील ग्रामसेवकाला समाधानकारण उत्तरे देता आली नाही. त्यामुळे समितीने त्यांना शो-कॉज नोटीस बजावली. महागावच्या पंचायत समिती सभागृहात शिक्षण विभागाची कानउघाडणी केली. विविध बाबींचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

कळंब पंचायत समितीत समितीने शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. यवतमाळ लगतच्या लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेलाही समितीने भेट दिली. समितीच्या आगमनामुळे यंत्रणेत धडकी भरली होती. ठिकठिकाणी सदस्यांच्या स्वागतासाठी सरबराई करण्यात आली. बाभूळगाव येथे ११ ग्रामसेवकांकडून झालेल्या अपहार प्रकरणात काय कारवाई करण्यात आली, यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला. नेरमध्ये गोपनीय चर्चा होऊन समिती निघून गेली. गोपनीय दौरा झाला उघडसमितीच्या पाच पथकांनी मंगळवारी रात्री दौऱ्याचे गोपनीयरीत्या नियोजन केले होते. मात्र रात्रीच हा दौरा फुटला. त्यामुळे कोणते पथक कुठे येणार आहे, याची चाहूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली हेाती. त्यानुसार बुधवारी संबंधितांनी समिती सदस्यांच्या सरबराईत कुचराई हेाऊ नये म्हणून दक्षता घेतली. सोशल मीडियावर सातत्याने समिती आता येथून निघाली, या मार्गाने गेली, येथे भेट देणार आहे, असे मॅसेज दिवसभर फिरत होते. यात शिक्षक सर्वाधिक उत्सुक दिसून आले.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgram panchayatग्राम पंचायत