शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टहॅन्ड परीक्षेत ‘शॉर्टकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:04 IST

लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकेंद्राधिकाऱ्यांची साथ : कोरा पेपर देणारे ‘पास’, परीक्षा परिषदेकडे तक्रार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही असा गैरप्रकार झाल्याची तक्रार शासकीय परीक्षा परिषदेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे.कुठलीही प्रॅक्टीस न करता शॉर्टहँड परीक्षेत पास होण्यासाठी मोठी उलाढाल होते. एका पेपरसाठी तब्बल दहा हजार रुपयांचा व्यवहार केला जातो. परीक्षेपूर्वीच हे सर्व सेटलमेंट केले जाते. परीक्षार्थ्याने काय करायचे, पेपर लिहायचा कुणी हे सर्व ठरविण्यात येते. यात टायपिंग इंस्टिट्यूटच्या संचालकाची महत्त्वाची भूमिका असते. काही टायपिंग इंस्टिट्यूट यासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. शॉर्टहँड म्हणजे काय, हेही माहीत नसलेले विद्यार्थी परीक्षेत पास होतात.परीक्षा सुरू असताना टायपिंग इंस्टिट्यूटच्या संचालकांना तसा कक्षात प्रवेश नसतो. पण लघुलेखन परीक्षेकरिता त्यांना मुक्तता असते. शॉर्टहँडचा पेपर आणण्यापाूसन तर पेपर लिहून घेण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते पार पाडून घेतात. पास होण्यासाठी ‘व्यवहार’ झालेल्या विद्यार्थ्यांचे कोरे पेपर बाहेर काढले जातात. विद्यार्थ्याची केवळ परीक्षा केंद्रावर हजेरी असते. काढलेले पेपर तज्ज्ञांकडून लिहून घेतले जातात. काही हुशार विद्यार्थ्यांची मदत यासाठी घेतली जाते. प्रत्येक परीक्षेत होणारा हा प्रकार थांबविण्यासाठी परीक्षा परिषदेने उपाय करावे, अशी पालकांची अपेक्षा आहे. केंद्राधिकाºयांकडे आलेल्या कोºया उत्तरपत्रिकेवर उभ्या आणि तिरप्या रेषा ओढल्यास इतरांना उत्तरे लिहिता येणार नाही. लिहिल्यास तपासताना लक्षात येईल. पुढे होणाºया परीक्षांमध्ये ही दक्षता प्रामाणिकपणे घ्यावी, अशी मागणी आहे.