शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

विमा योजनेला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: August 7, 2014 00:05 IST

शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

मारेगाव : शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र मागील हंगामातील पीक विम्याचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेस फारसा प्रतिसाद दिलाच नाही़ मागील सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तालुक्यातील बिगर कर्जदार चार हजार ८१२ शेतकऱ्यांनी चार हजार १९६ हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी तब्बल १६ लाख ६३ हजार ४३० रूपयांच्या विमा हप्त्याची रक्कम बँकात जमा करून पीक विम्याचा लाभासाठी संरक्षित केले होते़ त्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस, सोयाबीन व तुरीचे होते़ मागील हंगामात अतिवृष्टी, गारपिट, संततधार पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबिनची नासाडी झाली होती. परिणामी एकरी उत्पादन घटले, सोबतच सोयाबीन काळे पडले होते. त्यातच सोयाबिनला भाव सुध्दा कमी मिळाला. तालुका कृषी कार्यालय व महसूल विभागने मागीलवर्षी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे केवळ सांत्वन केले़ खरीप पिकांची आणेवारी ५० टक्केच्या आत आल्याने शेतकऱ्यांना कापूस नाही तर किमान सोयाबीन, तूर पिकाला विम्याचा लाभ मिळेलच, अशी अपेक्षा होती़ तथापि तालुक्यात सर्वात कमी पेरा असणाऱ्या एकमेव ज्वारीलाच पीक विमा मंजूर झाला़ त्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी या पाचही महसूल मंडळातील मोजक्या गावातील केवळ २६४ शेतकऱ्यांना १२९़५५ हेक्टर क्षेत्रासाठी १० लाख ४५ हजार १३० रूपये मंजूर झाले अन् शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला़ मात्र या अन्यायाविरुद्ध कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही, हे विशेष़ आता यावर्षी नव्याने सन २०१४-१५ साठी प्रथम हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा आणि नंतर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्याचे शासन निर्देशाप्रमाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले़ मात्र आधीच पीक विमा योजनेबाबत संतापलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेला तालुक्यात फारसा प्रतिसाद दिलाच नाही़तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यकांना गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले़ तथापि त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अल्पभूधारक व इतर अशा केवळ एक हजार १४६ शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारीचे एक हजार ७२ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी केवळ सात लाख ३२ हजार ६१७ रूपयांचा विमा हप्ता बँकात भरला आहे. तथापि मागील वर्षात कपाशी व सोयाबिनला पीक विमा का मिळाला नाही, कुणाची चूक झाली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मागीलवर्षी लाभ न झाल्याने यावर्षी उदासीनता दिसून आलाी. (तालुका प्रतिनिधी)