शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! यवतमाळातील रुग्ण नागपुरात पळविण्यासाठी रुग्णवाहिका चालकांसोबत डिलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:46 IST

वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे.

ठळक मुद्देमल्टीस्पेशालिटीकडून राखली जाते त्यांची खास बडदास्त

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे. रुग्णवाहिका चालकांशी टक्केवारीचे गणित जुळवून डिलिंग केले जाते. अशीच एक डिलिंग यवतमाळनजीकच्या बुधवारी सामिष पार्टी देऊन करण्यात आली. यात नागपूरच्या काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने पुढाकार घेतला होता.नागपूरसह महानगरात मोठमोठे खासगी रुग्णालय उदयास आले. एकाच छत्राखाली सर्व सुविधा दिली जाते. बहुतांश ठिकाणी व्यवसायासोबतच वैद्यकीय नितीमत्ता जोपासली जाते. परंतु काहींनी केवळ व्यवसायिकतेला प्राधान्य देत रुग्ण मिळविण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या ग्रामीण रुग्णाला हेरण्यात येते. यासाठी रुग्णवाहिका चालकांचा उपयोग केला जात आहे. जिल्हास्तरावरून अधिक उपचारासाठी मल्टीस्पेशालिटीत जाण्याचा सल्ला दिला की रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. हीेच नस पकडून मल्टीस्पेशालिटींनी रुग्णवाहिका चालकांना टार्गेट दिले आहे. रुग्णाला आपल्या रुग्णालयात घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला उपचार खर्चाच्या बिलावर थेट कमिशन दिले जाते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्ण पळविण्याची स्पर्धा दिसून येते.यवतमाळातील रुग्णवाहिका चालकांशी वाटाघाटी करण्यात आल्या. यासाठी नागपुरच्या स्पेशालिटीतील ‘एकजण ’ मोठी आॅफर घेऊन यवतमाळात दाखल झाला. डिलिंगसाठी  जागा निवडण्यात आली. यवतमाळ मेडिकल आवारातील एका ज्येष्ठ रुग्णसेवकामार्फत हे डिलिंग पूर्ण करण्यात आले. यापूर्वी मल्टीस्पेशालिटीकडून थेट मेडिकलमध्ये कार्यरत सीएमओंनासुद्धा (कॅज्युलीटी) कमिशन दिले जात होते. यासाठी ‘रेफर टू’ उपचारपद्धती अवलंबिणे हीच एक अट होती. मात्र आता यवतमाळ मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी ही चेन मोडीत काढली. मात्र त्यावर तोड म्हणून आता रुग्णवाहिका चालकांशी हातमिळवणी करण्यात आली. ही बैठक चार तास रंगली. स्पेशल ट्रिटमेंट देऊन ही टिम नागपूरला परत गेली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल