शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाचशे वर्षांत पक्ष्यांच्या १६१ प्रजाती नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:20 IST

birds : पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमजान विराणी अनेक वर्षांपासून पक्षी प्रजातींचा अभ्यास करीत आहेत.

 - अविनाश साबापुरे

यवतमाळ : गेल्या पाचशे वर्षात जगभरातील पक्ष्यांच्या १६१ प्रजाती नष्ट झाल्या. पक्ष्यांच्या अधिवासांना झपाट्याने धोके वाढत असल्यामुळे आगामी शंभर वर्षात पाखरांच्या तब्बल १२०० प्रजाती संपुष्टात येतील, असा गंभीर धोका मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी यांनी आपल्या संशोधनातून वर्तविला आहे.पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमजान विराणी अनेक वर्षांपासून पक्षी प्रजातींचा अभ्यास करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा होत असताना त्यांनी संशोधन अहवाल पुढे आणला. त्यात ‘वर्ल्ड वॉच’ संस्थेच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी म्हटले की, इसवी सन १५०० पासून पाच शतकात जगातील १६१ पक्षी प्रजाती नष्ट झाल्या. पुढील शतकात १२०० पक्षी प्रजाती नामशेष होतील.जगभरात पक्ष्यांच्या १८०० प्रजातींची नोंद आहे. त्यातील १३७५ प्रजाती भारतात आढळतात. विदर्भात ४१० आणि यवतमाळ जिल्ह्यात २३० पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचेही डॉ. विराणी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जंगलातील अतिक्रमण, अवैध चराई, वणवा, शेतात कीटकनाशकांचा अतिरेकी वापर अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचे अधिवास व अस्तित्व धोक्यात येत आहेत. 

पक्ष्यांना धोका निर्माण केल्यास ६ महिने तुरुंगवास पक्ष्यांसह प्राणी व वनस्पतींच्या संरक्षणासाठी १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम लागू करण्यात आला. त्यानुसार पक्ष्यांच्या अधिवासांना इजा पोहोचविणाऱ्या व्यक्तीस ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.  जलस्रोत व हंगामी पाणथळ क्षेत्राचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाकडे असते. तेथील पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन विभाग व मत्स्य विभागालाही जबाबदारी दिली जावी, अशी मागणी डॉ. विराणी यांनी केली आहे.

रानपिंगळा राज्य पक्ष्याच्या शर्यतीतराज्याचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असलेल्या ‘हरियाल’ (हिरवे कबुतर) पक्ष्याचे दर्शन दुर्मीळ झाल्याने मेळघाटचे वैभव ठरलेला रानपिंगळा राज्य पक्ष्याच्या शर्यतीत उतरला आहे. राज्यातील पक्षिप्रेमी, पक्षी अभ्यासकांसह मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने यास महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा, अशी शिफारस यापूर्वीच केली आहे. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यYavatmalयवतमाळ