शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार

By admin | Updated: December 10, 2015 02:32 IST

कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाला.

वणीतील अपघात : तरुण गंभीर जखमी, ट्रक शिरला चहा टपरीत वणी : कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना वणीनजीकच्या एका जिनिंगसमोर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रभाकर सखाराम पिदूरकर (६०) आणि गीता प्रभाकर पिदूरकर (५०) रा. कोलेरा अशी मृत पती-पत्नीचे नाव आहे. तर सुरज पुंजाराम पिदूरकर (२२) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी कोलेरा येथून पिदूरकर परिवार दुचाकीने (एम.एच.२९- एजी-२९५९) वणीकडे येत होता. त्यावेळी कोलेरा पिंपरीकडे एका कोळसा खाणीकडे भरधाव हायवा ट्रक जात होता. वणीनजीकच्या एका जिनासमोर या ट्रकने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, दुचाकी काही अंतरावरपर्यंत फरफटत गेली. यात दुचाकीवरील प्रभाकर, गीता पिदूरकर आणि सुरज गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ तिघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्रभाकर व गीता या दाम्पत्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर सुरजवर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी चंद्रपूरकडे रवाना करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो नजीकच्या एका चहा टपरीत शिरला. मात्र चहाटपरी बंद असल्याने अनर्थ टळला. अपघातानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक असलम खान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)