शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पुसद नगर परिषदेतील देयक भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:00 IST

एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देशहर ठाण्यात तक्रार । कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पुसद पालिकेमध्ये खासगी तांत्रिक सल्लागार, कंत्राटदार मो.आवेज मो.इलियास यांनी संगनमताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकाच कामाचे दोनदा देयक काढले. यात सुमारे आठ लाख ८४ हजार सहा रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी शिवसेनेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र अद्यापही त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देयके काढण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या अपहारासंबंधात वारंवार तक्रार करूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, संतोष दरणे, विष्णू शिकारे, सीमा महाजन आदींनी गुरुवारी थेट शहर पोलीस ठाणे गाठून ठाणेदारांकडे तक्रार सादर केली.या तक्रारीत शिवसेना सदस्यांनी पालिकेचे २१ लाख रुपयांचे व्हाऊचर गायब असल्याचा आरोप केला. व्हाऊचर गायब असल्याने यातही आर्थिक अफरातफर झाल्याचे त्यांनी म्हटले. या दोन्ही प्रकरणात चौकशी केल्यास किमान ५० ते ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची अपेक्षाही व्यक्त केली. देयक अदा करणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शिवसेनेची वकील सेना व सर्व शिवसेना नगरसेवक न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले.पालिका प्रशासनाला फोडणार घामशिवसेनेने पालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार पुकारून गेंड्याची कातडी पांघरून असलेल्या प्रशासनाला घाम फोडण्याचा इशारा दिला. यापूर्वी वकील सेनेने मालमत्ता कराविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. आता भ्रष्टाचाराविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताना शिवसेना तालुका प्रमुख दीपक काळे, विशाल पेन्शनवार, अजय चिद्दरवार, राजू महाजन, संजयकुमार हनवते, विजय बाबर, सुभाष बाबर, गोलू चापके, संदीप घोंगडे, संदीप लाभशेटवार, अभिषेक दुपारते आदी उपस्थित होते.