शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:00 IST

शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देअटकेचा निषेध : संतोष ढवळेवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.कामगार नोंदणी कार्यालयात शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार शहर ठाण्यात नोंदविण्यात आली. यानंतर ढवळे यांना मंगळवारी अटक झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. तालुक्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले.संतोष ढवळे यांच्यावर पालकमंत्री मदन येरावार यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. ढवळे हे निर्दोष असून त्यांनी खºया कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र पालकमंत्र्यांकडून राजकारण केले जात असून भाजपाच्या ठराविक कार्यकर्त्यांंनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. हा मनसुबा उधळण्याचा प्रयत्न केल्यानेच ढवळे यांना तुरुंगात जावे लागल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.ढवळे यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, किशोर इंगळे, श्रीधर मोहोड, शहर प्रमुख पिंटू बांगर, एकनाथ तुमकर, पंचायत समितीचे उपसभापती गजानन पाटील, संजय रंगे, हरिभाऊ लिंगणवार, गजानन बेजंकीवार, राजेश टेंभरे यांनी केले.माफिया राज मोडण्याचे आव्हानपालकमंत्र्यांच्या पाठबळाने शहरासह जिल्ह्यात माफियाराज बोकाळले आहे. पालकमंत्री सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी सत्तेचा वापर करीत आह, असा आरोप करीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी किमान पोलिसांनी माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना