आर्णी : युवा सेनेच्या तालुकाध्यक्षाला मारहाण करून रिव्हॉल्वर रोखणाऱ्या ठाणेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी आर्णी येथे शिवसेनेच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. युवा सेनेचे तालुकाध्यक्ष नीलेश मस्के यांना ठाणेदारांनी आपल्या कक्षात मारहाण केली, रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप आहे. यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार संजय खंदाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कोणतीही कारवाई न झाल्याने आर्णी बंदची हाक देण्यात आली. मंगळवारी शिवसेनेने शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनावर तालुका प्रमुख रवी राठोड, लिंगाजी मंगाम, रमेश ठाकरे, राहुल लाभसेटवार, उत्तम राठोड, रामेश्वर जाधव, स्वप्नील साठे, नीलेश गावंडे, प्रवीण भाकरे, गुड्डू वानखडे, अश्विन जाधव, बाळू राठोड, शिवाजी भोयेवाड, राहुल मुजमुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
शिवसेनेचा आर्णीत कडकडीत बंद
By admin | Updated: December 2, 2015 02:35 IST