शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय राळेगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:18 IST

राळेगाव वनपरिक्षेत्रात दहशत माजविणाऱ्या टी-१ वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्ती पांढरकवडाच्या लोणी परिसरात मंगळवारी दाखल झालेत.

ठळक मुद्देएक बछडा गसवला : मध्य प्रदेशातील हत्तीच्या मदतीने नर बछडा व वाघाचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : राळेगाव वनपरिक्षेत्रात दहशत माजविणाऱ्या टी-१ वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्ती पांढरकवडाच्या लोणी परिसरात मंगळवारी दाखल झालेत. या हत्तीच्या मदतीने वनविभागाचे पथक वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेत असून एका बछड्याला जेरबंद करण्यात शनिवारी यश आले. शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय अशी या हत्तींची नावे आहेत.पांढरकवडा राळेगाव, आणि कळंब या तीन तालुक्यात टी-१ या नरभक्षक वाघिणीला बोराटी येथील नाल्यात ठार केले. ही कारवाई २ नोव्हेंबरला रात्री केली. त्यानंतर या वाघिणीच्या बछड्यांचा विषय ऐरणीवर आला. त्यांच्या शोधासाठी वन विभागाने वनपरिक्षेत्रात शोधमोहीम सुरूच ठेवली. परंतु बछड्यांचा शोध लागला नाही. अखेर वन विभागाने मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्तींना पाचारण केले. या चार प्रशिक्षित गजराजांची फौज लोणी येथे माहुतासह वनकर्मचाºयांच्या मदतीला आली आहे. हे चार गजराज जंगलातून गस्त करीत असताना रस्ता स्वत: बनवतात. एकमेकांशी व माहुताशी सांकेतीक भाषेत संवाद साधून वाघीणीच्या बछड्यांचा व वाघाचा गंध घेत वाटचाल करतात. जर त्यांना वाघ किंवा बछडयांचे लोकेशन मिळाले तर दोनशे मीटरचा घेराघालून त्या जनावरास जागीच खिळवून ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. जेणे करून हत्तीवरील डॉक्टर व शार्प शुटर यांना बछडयाला डॉट करणे सोईचे होईल. व ही मोहिम लवकरात लवकर फत्ते होईल, असे उपवनसंरक्षक के. अभर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या मोहिमेत यावेळी वन विभागाच्या अधिकाºयांसह वैद्यकीय अधिकारी सोबत आहे. एका बछड्याला शनिवारी बेशुद्ध करून पकडण्यात आले. आता अन्य एक बछडा व वाघ यांना जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघ