शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहरात शिवसेनेच्या अभिवादन फलकाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:27 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला.

ठळक मुद्देशिवसैैनिक संतप्त : ठाण्यात तीन तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली.वणी शहरात शिवसेनेचे दोन गट असून यांपैैकी एका गटाचे नेते सुनील कातकडे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात विविध ठिकाणी अभिवादन फलक लावले होते. मात्र बुधवारी सकाळी या फलकांपैैकी शिवाजी चौैक, नांदेपेरा मार्गावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ, बसस्थानकाजवळ व घोन्सा फाटा अशा चार ठिकाणचे फलक अज्ञात समाजकंटकाने लंपास केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर कातकडे गट संतप्त झाला. दुपारी १२ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर या गटाचे शेकडो कार्यकर्ते सुनिल कातकडे यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात पोहचले.जोवर आरोपीला अटक करण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नाही, अशी भूमिका या शिवसैैनिकांनी घेतली. मात्र चौैकशीसाठी थोडा वेळ द्या, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यामुळे शिवसैैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. सुनिल कातकडे यांनी याप्रकरणी रितसर तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना