शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना तालुका प्रमुखाने पाच लाखांची खंडणी मागितली

By admin | Updated: July 2, 2015 02:55 IST

पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यावरून येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला शिवसेनेचे तालुका प्रमुख, संघटक व इतरांनी मारहाण केली.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मारहाण : संघटकासह सात अटकेत घाटंजी : पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यावरून येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला शिवसेनेचे तालुका प्रमुख, संघटक व इतरांनी मारहाण केली. या प्रकरणी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये शिवसेनेचे घाटंजी तालुका प्रमुख विजय कोंडलवार (रा. राजूरवाडी पांढरकवडा), संघटक नीलेश चव्हाण (रा.मुरली बंदरपोड), मनोज मोगरे, कैलास कुमरे, शंकर मोगरे, नितेश कुमरे, रामदास मोगरे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि ३८४, ३९५, ३६३, ३५४, ३३२, ४२७, ३४१, ३२५ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सातही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पी.एम.घटाळे यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली आणि तपासाबाबत पोलिसांना टीप्स् दिल्या. पोलीस सूत्रानुसार, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आरएफओ घटाळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. मात्र ही रक्कम न दिल्याने मारहाणीची ही घटना घडली. घाटंजी-पारवा रोडवरील इंझाळा नर्सरीमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता आरएफओ घटाळे यांना मारहाण करून त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावून नेण्यात आला. यावेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या महिला वनरक्षकाचा विनयभंग करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)