शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नेर नगर परिषदेत पुन्हा शिवसेनाच निर्विवाद१८ पैकी नऊ जागा काबीज : काँग्रेस-राष्ट्रवादीला सात जागांवर रोखले, दोन अपक्ष विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:42 IST

थेट जनतेतून होणारी नगराध्यक्ष पदाची पहिलीच निवडणूक शिवसेनेने काबीज केली. नगराध्यक्षपदावर विजय मिळवितानाच १८ पैकी शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : थेट जनतेतून होणारी नगराध्यक्ष पदाची पहिलीच निवडणूक शिवसेनेने काबीज केली. नगराध्यक्षपदावर विजय मिळवितानाच १८ पैकी शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक आणि आपलाच नगराध्यक्ष असे निर्विवाद यश मिळविण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित दोन नगरसेवक अपक्ष निवडून आले.प्रभाग १ अ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या कविता सुभाष भोयर ७६२ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या प्रतिभा वसंत राठोड ७२४ मते घेऊनही पराभूत झाल्या. ब मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सुभाषचंद्र दामोधर भोयर ८३४ मतांसह विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विनोद मारोतराव जयसिंगपुरे ५७७ मते घेऊन पराभूत झाले. प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेचे संदीप विश्वंभर गायकवाड (मते ९५२) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी रिपाइं व भाजपा युतीचे मोहन गोविंदराव भोयर यांना केवळ २९६ मते पडली. या प्रभागात शिवसेनेला एकतर्फी विजय मिळाला. ब मध्ये शिवसेनेच्या वैशाली प्रशांत मासाळ (मते ६४५) विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवार उज्वला गणेश मेंढे (मते ४७७) पराभूत झाल्या. प्रभाग ३ अ मध्ये शिवसेनेचे शंभू राघोजी नेवारे (मते ४६४) विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे इरफान युनुस आकबानी (मते ४४४) यांना पराभूत केले. ब मध्ये शिवसेनेच्या सरिता मनोज सुने (मते ७३१) विजयी झाल्या. त्यांना टक्कर देणाऱ्या अपक्ष उमेदवार रहिमा खातून नजीर खाँ राही (मते ४४४) यांना पराभवाची चव चाखावी लागली.प्रभाग ४ अ मध्ये शिवसेनेचे गटनेते पवन शामलाल जयस्वाल हे ६५४ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे सलीमशाह उमरशाह (मते ५९३) यांना पराभव स्वीकारावा लागला. तर ब मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या शकीलाबी जफरखान (मते ७०३) विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुचिता उमेश चिरडे (मते ४२५) पराभूत झाल्या. प्रभाग ५ अ मध्ये शिवसेनेचे नितीन उर्फ किशोर अण्णाजी माकोडे (मते ४२८) विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सिद्धीकी अहमद बसीरखान (मते ३९२) पराभूत झाले. ब मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या मीना अतुल पिंपळकर या ७२३ मते घेऊन विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या रश्मी सुनील पेटकर यांना अवघ्या ४९४ मतांवर रोखले.प्रभाग ६ अ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे शहबाज अहमद अब्दूल कलाम अब्दूल हे १०४४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मो. इब्राहीम हाजी दाऊद नूर यांना ३२६ मतांवर रोखले. या प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला एकतर्फी मतदान झाल्याचे चित्र आहे. ब मध्ये युतीच्या जरीना परवीन जबिल्ला खाँ (मते ६१५) विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी अपक्ष शमाबी शेख निजाम (मते ४१२) पराभूत झाल्या. प्रभाग ७ अ मध्ये अपक्ष उमेदवार आफरीन वाजीद खान (मते ८६१) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस युतीच्या नगमाबी अखील शेख (मते ६५६) यांना पराभूत केले. ब मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे तन्वीर खान शेरे अफगान खान ८९० मतांसह विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे वैभव मधुकर जडेकर ४३२ मतांसह पराभूत झाले. प्रभाग क्र. ८ अ मध्ये शिवसेनेच्या रुपाली सतीश शिंदे (मते ५९२) विजयी तर राष्ट्रवादी-काँग्रेस युतीच्या ममता सत्यविजय गुल्हाने (मते ४९७) पराभूत झाल्या. ब मध्ये अपक्ष सतीश किसन रायफडे (मते ५२२) विजयी तर शिवसेनेचे गजानन बळीराम दहेलकर (मते ३९२) पराभूत झाले. प्रभाग क्र. ९ अ मध्ये शिवसेनेच्या अर्चना प्रमोद वासनिक (मते ४६३) विजयी तर अपक्ष अर्चना अशोक इसाळकर (मते ३७९) पराभूत झाल्या. ब मध्ये शिवसेनेचे शालिक उत्तमराव गुल्हाने (मते ८०५) विजयी झाले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सुरेश नथ्थूसा जयसिंगपुरे (मते ४०२) पराभूत झाले.दोन दाम्पत्य विजयीप्रभाग १ अ मध्ये सुभाष दामोधर भोयर तर याच प्रभागात ब मध्ये त्यांच्या सहचारिणी कविता सुभाष भोयर नगरसेवक पदाच्या रिंगणात उभे होते. विशेष म्हणजे हे दोघेही पती-पत्नी आपआपल्या गटात विजयी झाले. याच प्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सुनीता पवन जयस्वाल विजयी झाल्या. तर त्यांचे पती शिवसेनेचे गटनेते प्रभाग ४ मधून विजयी झाले.भाजपा-रिपाइंला भोपळानेर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीने सत्ता काबीज करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) सोबत युती करून उमेदवार उभे केले होते. खुद्द पालकमंत्री प्रचारासाठी आले होते. मात्र एकाही प्रभागात विजय मिळविता आला नाही. आश्चर्य म्हणजे नगरसेवकांच्या १८ ठिकाणच्या लढतींमध्ये भाजपा-रिपाइंला दुसऱ्या क्रमांकाची मतेही मिळविता आलेली नाही. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. एकूण १५,१८९ पैकी या युतीला केवळ ३,१०१ मते मिळाली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक