शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 20:41 IST

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. 

यवतमाळ : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना स्थान दिले गेले नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. खासदार गवळी यांचा नाराजी प्रकट करणारा व्हिडिओ वाशिम जिल्ह्याच्या रिसोडमधून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बाजोरिया अथवा रायमुलकर यांना स्थान देऊन अकोला, बुलडाणा जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यावे, अशी एकमुखी मागणी सामूहिकरीत्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रायमुलकर, बाजोरिया, संजय गायकवाड, सेनेचे माजी आमदार तसेच शिवसेनेच्या पाचही जिल्ह्यातील प्रमुखांचे समर्थन असल्याचे भावना गवळी यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले.अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील सेनेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत पश्चिम विदर्भातील नेत्यांचे बहुमत असताना ‘मातोश्री’वरून हे बहुमत झुगारून  त्यांना स्थान दिले गेले नाही, उलट हे पद दुसरीकडे गेल्याने आपली जाहीर नाराजी असल्याचे खासदार गवळी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

संतप्त प्रतिक्रियादरम्यान, गवळींच्या या व्हिडिओवर यवतमाळ जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाºया भावनातार्इंचा अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांसाठी आग्रह का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार