शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बाभूळगाव येथे शिवसेनेचा तर राळेगावात काँग्रेसचा नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार निर्धारित वेळेत राळेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शेषराव शेराम यांचेच दोन अर्ज दाखल झाले. छाननीत ते वैध ठरले. त्यामुळे राळेगाव येथे काँग्रेसचे शेराम हे नगराध्यक्षपदी आरूढ होणे निश्चित झाले आहे. बाभूळगाव येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या उमेदवार संगीता मालखुरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींची निवडणूक आटोपल्यानंतर बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. यात राळेगाव आणि बाभूळगाव येथे काँग्रेसशिवसेना उमेदवारांचा एकच अर्ज दाखल झाल्याने तेथे काँग्रेस व शिवसेनेचा नगराध्यक्ष आरूढ होणार आहे. मात्र, महागाव येथे तिढा कायम आहे. कळंब येथे काँग्रेस, झरी येथे काँग्रेस व शिवसेना तर मारेगाव येथे काँग्रेस, शिवसेना व भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार निर्धारित वेळेत राळेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शेषराव शेराम यांचेच दोन अर्ज दाखल झाले. छाननीत ते वैध ठरले. त्यामुळे राळेगाव येथे काँग्रेसचे शेराम हे नगराध्यक्षपदी आरूढ होणे निश्चित झाले आहे. बाभूळगाव येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या उमेदवार संगीता मालखुरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरल्याने बाभूळगाव येथेही शिवसेनेच्या मालखुरे अविरोध नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी अधिकृत घोषणा १४ फेब्रुवारीला होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. कळंब, मारेगाव आणि झरी येथे कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. बुधवारी कळंब येथे काँग्रेसतर्फे सिद्दीकी अफरोज बेगम फारुख अहमद यांनी दोन अर्ज दाखल केले. अपक्ष अब्दूल अमरीनजहा अजीज यांनीही नामांकन भरले. त्यामुळे कळंबमध्ये जवळपास काँग्रेसचेच सिद्दीकी अफरोज बेगम फारुख अहमद हे नगराध्यक्षपदी विराजमान होणे निश्चित मानले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत काहीही सांगणे अवघड आहे. मारेगाव येथे काँग्रेसतर्फे नंदेश्वर खुशाल आसूटकर, भाजपतर्फे हर्षा अनुप महाकूलकर तर शिवसेनेतर्फे मनीष तुळशीराम मस्की यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी मागे घेतल्यानंतरच तेथील चित्र स्पष्ट होणार आहे.झरी येथे शिवसेनेतर्फे ज्याेती संजय बिजगुणवार तर काँग्रेसतर्फे सुजाता श्रीकांत अनमूलवार यांनी नामांकन दाखल केले आहे.  उमेदवारी मागे घेतल्यानंतर तेथील चित्र स्पष्ट होईल. 

महागावमध्ये उलथापालथीची शक्यता, अभद्र युती होण्याचे संकेत 

- महागाव नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. तेथे भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती. बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे सुरेखा विनोद सुरोशे (कोपरकर), सुनंदा दिलीप कोपरकर आणि जयश्री संजय नरवाडे या तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपतर्फे रंजना दीपक आडे तर शिवसेनेतर्फे करुणा नारायणराव शिरबिरे यांनीही अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल झाल्याने, महागाव येथील तिढा वाढला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जयश्री नरवाडे यांच्या अर्जाला भाजप नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहे. महागाव येथे भाजप व शिवसेना यांची अलिखित युती झाली असून, नगराध्यक्षपद प्रत्येकी सव्वा वर्ष वाटून घेणार असल्याचे पडद्याआड ठरले आहे. या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना