शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात शिवसेना भाजप युद्ध रस्त्यावर; शहरात लावले भाजपाविरोधी फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 09:54 IST

राज्यातील शिवसेना भाजपा युतीत उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो. आता हे युद्ध रस्त्यावर आले असून यवतमाळात शिवसेनेने भाजपाच्या धोरणावर जाहीर टिका करणारे फलक लावले आहे.

ठळक मुद्देयुतीत राहून भाजपाच्या धोरणावर जाहीर टीकापोस्टर वॉर

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील शिवसेना भाजपा युतीत उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो. आता हे युद्ध रस्त्यावर आले असून यवतमाळात शिवसेनेने भाजपाच्या धोरणावर जाहीर टिका करणारे फलक लावले आहे. यावरून शिवसेना भाजपला कमी दाखवण्याची कोणतीच संधी सोडण्यास तयार नाही असे दिसून येते.जिल्ह्यातील शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून पुरेपूर प्रयत्न झाले आहेत. सहपालकमंत्रीपद देवून शिवसेनेला सत्तेतही दुय्यम स्थानावर ठेवण्यात आले. तेव्हापासूनच पक्षांतर्गत वादावादी सुरू आहे. आता शिवसेनेने फलकबाजी करत भाजपा विरोधी मोहीमच उघडल्याचे दिसून येते. काश्मिरातील लष्करी हल्ल्याचा हवाला देत शिवसेनेने भाजपाच्या देशभक्तीचा फोलपणा दाखवून दिला आहे. ‘हा आपला भाजपा’ या मथळ्याखाली भाजपा व पिडीपा सरकारने काश्मिरात लष्करी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविल्याची घटना ठळकपणे मांडली आहे. तर याच फलकावर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात शिवसेनेच्या अखत्यारित असलेल्या परिवहन मंडळाकडून राबवली जात असलेली दिवंगत बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची जाहिरात करण्यात आली आहे. शहीद कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी व प्रवासातील सवलतीची घोषणा यातून करण्यात आली आहे. शहीद सन्मान योजनेचा आधार घेत भाजपाच्या कश्मिरातील लष्कराविरोधी कारवाईचा एकप्रकारे निषेध केला आहे. भाजपासोबत सत्तेत राहून शिवसेना नेहमीच विरोधकाची भूमिका पार पाडत होती. आता शिवसेनेची उघड भूमिका जाहीर झाली आहे. कुठल्याही मुद्यावर भाजपाला गल्लीतही सोडायचे नाही हा अजेंडा राबविला जात आहे. यातूनच शहरात फलकबाजीला उधाण आले असून भाजपाचा जाहीर निषेध करणारे फलक शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नावाने लावण्यात आले आहे.

भाजपाच्या भूमिकेकडे लक्षशिवसेनेने फलकबाजीच्या माध्यमातून केलेले आक्रमण स्थानिक भाजपा कोणत्या पद्धतीने परतवून लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा