शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर परिसरात वाघाचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:00 IST

गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देपोलिसांच्या गावभेटी : नागरिक दहशतीखाली, सतर्क राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले.राळेगाव तालुक्यात नरभक्षी वाघिणीचा धुमाकूळ सुरू असतानाच शिरपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक पट्टेदार वाघ भटकत आहे. २ आॅक्टोबरला शिरपूर शिवारातील एका शेतात या वाघाने दर्शन दिले. काहींनी त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरलदेखिल केला. याच वाघाने मागील आठवड्यात निवली येथे एका गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे नागरिकांच्या दहशतीत भर पडली आहे. ४ आॅक्टोबरला हाच वाघ खांदला शिवारात फिरत होता. अनेक नागरिकांनी त्याला पाहिले. ५ आॅक्टोबरला सुंदरनगर परिसरात हा वाघ भटकत होता, तर शनिवारी या वाघाने निवली परिसरातील नागरिकांना दर्शन दिले. यामुळे नागरिक शेतात जाण्यासाठी घाबरत असून शेतातील कामे त्यामुळे खोळंबली आहेत. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार, पीएसआय योगेश दंदे, राजू बागेश्वर, योगेश ढाले यांनी परिसरातील खांदला, सुंदनगर, निवली यासह विविध गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शन केले.एकट्याने जंगल शिवारात जाऊ नये, वाघ दिसल्यास तातडीने पोलिसांशी अथवा वनविभागाशी संपर्क करून माहिती द्यावी, रात्रीच्यावेळी अंगणात गुरेढोरे बांधू नयेत, वाघ दिसल्यास त्याच्याशी कुणीही छेडछाड करू नये, तातडीने सुरक्षितस्थळी पोहोचावे, अशा सूचनाही ठाणेदार दीपक पवार यांनी नागरिकांना केल्या.वाघाचे दरदिवशी दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झाले आहे. हा वाघ पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने गोपालकांनी जनावरांच्या चराईसाठी जंगलात जाणेही बंद केले आहे.वनविभागाप्रती नागरिकांचा रोषशिरपूर परिसरात वाघाचा मुक्तसंचार सुरू असताना वनविभागाचे अधिकारी मात्र या विषयात गंभीर नसल्याचा आरोप उकणीच्या सरपंचा संगीता खाडे यांनी केला आहे. निवली येथे वाघाने गोºह्यावर हल्ला केल्यानंतर त्याच दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. परंतु वनविभागाच्या अधिकाºयांनी दुसऱ्या दिवशी या गावाला भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल