शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:02 IST

जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती.

ठळक मुद्देज्योती कांबळे : सूक्ष्म नियोजनातून सोडली पाणी समस्या

विठ्ठल कांबळे ।आॅनलाईन लोकमतघाटंजी : जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती. परंतु यावरही तोडगा काढून ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या शिरोलीमध्ये पाणी व्यवस्थापन केले. सरपंच ज्योती गौतम कांबळे यांच्या या कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना सरपंच अवॉर्ड देवून सन्मानित केले.अतिशय गरीब परिस्थितीतून बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती कांबळे यांना आरक्षणामुळे गावचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याची आवड असल्याने सरपंच म्हणून मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी पुरेपूर वापर केला. लोकचर्चा, लोकसहभाग वेळपडल्यास ग्रामसभा घेवून अनेक समस्या मार्गी लावल्या. घाटंजी तालुक्यातील तीन हजार १६९ लोकसंख्या असलेल्या शिरोली गावात अनेक दिवसांपासून पाणी समस्या होती. पाच किमी अंतरावरून गावात नळयोजनेने पाणी आणले जात होते. हा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी होता. जलसंधारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने माहितीकोष तयार केला. गावातून पूर्व-पश्चिम वाहणारा नाला आहे. या नाल्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून चार बंधारे साकारण्यात आले. यात एक बंधारा व तीन कोल्हापुरी बंधारे आहेत. पाणीपुरवठ्याची विहीर असलेल्या अडाण नदीवरही बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. त्यानंतर गावातील पाण्याच्या इतर स्त्रोतांचीही पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या पाच व खासगी सहा विहिरी आहेत. दहा हातपंप व एक बोअरवेल आहे. नळयोजना ही १९८१ सालची असून तिची कालमर्यादा अधिक आहे. या पाणीपुरवठा विहिरीला पाणीपातळी कमी राहात असल्याने सतत गावात टंचाई जाणवत होती. बंधाऱ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून तसेच काही भागातील लोकसहभागातून गाळाचा उपसा केल्यानंतर पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.नाल्यावर सिमेंट बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. यासाठी १६ लाख २१ हजार रुपयांचा निधी खर्च केला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढली. परिणामी जवळच्या २५ हेक्टर शेतीत सिंचन करणे शक्य झाले. पाणीपुरवठा करून शासकीय योजनेतून चार बोअरवेल तयार केले. यालाही भरपूर पाणी आहे. जलव्यवस्थापनासोबतच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर नियमित वापरण्यात येते. याकरिता जलसंरक्षकाची नेमणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनासाठी ही भरपूर काम केले आहे. गावात २३६ पथदिवे असून सौरऊर्जेवर आहेत. चार एलईडी लाईट लावण्यात आले. येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांना डिजीटल करून संगणक व प्रोजेक्टचा वापर अध्यापनासाठी केला जातो. हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधकाम केले आहे. शौचालय वापरासाठी जनजागृती सुरू आहे. प्रत्येक वॉर्डातील नाल्यांचे काम झाले असून आरोग्याच्या दृष्टीने शोषखड्डे तयार केले आहे. गावातच आरोग्य उपकेंद्र व गुरांचा दवाखानाही आहे. या माध्यमातून नियमित लसीकरण मोहीम राबविली जाते. तंटामुक्त समिती सक्रिय असून दारू बंदीकरिताही प्रयत्न केले जात आहे. महिलांकरिता मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. गावात कुºहाडबंदी व चाराबंदीच्या अभियान सुरू असून ४४३ झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. गावातील प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून १९ प्रकारचे दाखले देण्याची सुविधा आहे. मोबाईल व डिश टीव्ही रिचार्ज, रेल्वे आरक्षण, पॅनकार्ड, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरणे, राजीव गांधी जीवनदायीचे कार्ड वाटप, धडक सिंचन योजनेचे अर्ज, आधारकार्ड, बँकेला लिंक करणे, वीज बिल भरणे, रोजगार हमीचे सर्व कामकाज, पांदण रस्ता, सिंचन विहिरी, कृषी विषयक योजनांची माहिती, शेतात सौरपंपांचा वापरसाठी प्रयोग, औषधी फवारणी मार्गदर्शन, जैविक शेती या सर्व उपक्रमांना राबविण्यात येते. गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच ज्योती गौतम कांबळे यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव, महिला मंडळ, बचत गट, नवचैतन्य बहुद्देशीय संस्था आणि ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.