यवतमाळ : १ जानेवारी १८१८ ला पुण्याजवळील भीमा कोरेगावच्या लढाईत २८ हजार पेशव्यांविरूद्ध केवळ ५०० महार रेजीमेंटच्या सैनिकांनी ऐतिहासिक विजय मिळविला होता. हा दिवस संपूर्ण भारतभर आंबेडकरी समाज शौर्य दिन म्हणून साजरा करतो. याच दिवसाचे औचित्य साधून रविवारी यवतमाळात शौर्य रॅलीसह आदरांजली पर्व आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाच्या पर्वावरचे आगळेवेगळे आयोजन असल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या अनुषंगाने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक बसस्थानक चौकामध्ये आंबेडकरी कवी-गायक बहुउद्देशीय संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन आदरांजली पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा क्रांतिकारी इतिहास या विषयावर व्याख्यान पार पडले. दुपारनंतर ‘निळा सलाम’ हा शौर्य गीतांचा महासंग्राम कार्यक्रम झाला. ‘भीमाचा दिवाना’ हा प्रकाश खरतडे यांचा एकपात्री नाट्यप्रयोग पार पडला. ‘निळा सलाम’ कार्यक्रमात प्रताप लोणारे, मदन वरघट, वैशाली कांबळे, प्रवीण कांबळे, भीमदास नाईक, रमेश वाघमारे, उमेश पाटील, वासूदेव मानकर, विनोद फुलमाळी, सूरज बनसोड, विजय टेंभुर्णे, सिद्धार्थ ओंकार, चिंतामण कांबळे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश भस्मे, आंबेडकरी कवी-गायक संघाचे अध्यक्ष मदन वरघट, सुधाकर धोंगडे, प्रतापदादा लोणारे, सूरज बन्सोड, वासूदेव मानकर, चिंतामण कांबळे, उमेश पाटील, ज्ञानदीप बागडे, भास्कराचार्य रोकडे, उमेश वाघमारे, मुकुंदराव दारूंडे, रवी श्रीरामे, बाबाराव मडावी, विजय गाडगे, निलध्वज कांबळे, धनंजय शेंडे, रवींद्र वासनिक यांनी सहकार्य केले. तर भीमा कोरेगाव शौर्यगाथा समिती यवतमाळच्या वतीने शौर्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागभूमी आर्णी रोडवरून रॅलीचा प्रारंभ झाला. एलआयसी चौकात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी प्रा. प्रवीण देशमुख यांचे व्याख्यान झाले. समिती अध्यक्ष सूरज खोब्रागडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर, प्रा. पराग पाटील, अश्विन क्षीरसागर, डॉ. प्रफुल्ल राऊत, ‘हेल्पींग हँड एमएच २९’चे प्रमुख नीलेश मेश्राम उपस्थित होते. शौर्य रॅलीमध्ये जोडमोहा, गणोरी, तरोडा, उमरी, मालेगाव, पिंपळगाव, तळेगाव, बारड कोपरा, गोदनी, बोदगव्हाण, राणी अमरावती, आसेगाव , सुकळी, लोहारा आणि वडगाव येथील नागरिकांचा समावेश होता. (शहर वार्ताहर)
शौर्य रॅली, गीत व सभेने लक्ष वेधले
By admin | Updated: January 2, 2017 00:25 IST