शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान शेतकरी महिलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला.

ठळक मुद्देवैशाली येडे : किल्ले पुरंदरवर सोहळा

निश्चलसिंग गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : शिवपूत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या.गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे !२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.

शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान शेतकरी महिलेलावैशाली येडे : किल्ले पुरंदरवर सोहळानिश्चलसिंग गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : शिवपूत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या.गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे !२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती