शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

शकुंतलेची रसद संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:59 IST

यवतमाळचे वैभव असलेल्या शकुंतलेची आर्थिक तरतूद संपुष्टात आली आहे. अशातच शकुंतला गत २०

अनिश्चित काळासाठी बंद : स्टेशनमास्तरला अमरावतीत हलविलेयवतमाळ : यवतमाळचे वैभव असलेल्या शकुंतलेची आर्थिक तरतूद संपुष्टात आली आहे. अशातच शकुंतला गत २० दिवसांपासून यवतमाळकडे फिरकली नाही. कधी येणार हेही निश्चित नाही. ही ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली, असे सूचना फलकच रेल्वेस्थानकावर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यवतमाळच्या रेल्वेस्टेशन निरीक्षकांना अमरावतीला हलविण्यात आले आहे. यामुळे शकुंतलेच्या अनिश्चिततेचे सावट अधिकच गडद झाले आहे. शतकापूर्वी ब्रिटिशांनी यवतमाळात शकुंतला सुरू केली. ही रेल्वे २०१६ पर्यंत निक्सन कंपनीच्या ताब्यात आहे. एक वर्षानंतर तिचा करार संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत शकुंतलेचे मेंटनेन्स हे शकुंतलेच्याच उत्पन्नावर सुरू होते. आता शकुंतलेचे उत्पन्नच संपुष्टात आले आहे. यामुळे ब्रिटिश कंपनीला ही रेल्वे चालविणे अवघड झाले आहे. ही रेल्वे स्वत:च्या मालकीची नसल्याने केंद्रानेही तिच्यासाठी तरतूद केली नाही. परिणामी ‘गरीबरथ’ थांबला आहे.साधारणत: वर्षभरापूर्वी आर्थिक तरतुदीअभावी ही रेल्वे बंद पडली होती. यानंतर राजकीय पातळीवर हालचाली झाल्या आणि शकुंतला सुरू झाली होती. ६ आॅगस्टपासून रेल्वे प्रशासनाने ही गाडी पुन्हा बंद केली आहे. आज २० दिवस झाले तरी ती पुन्हा सुरू झाली नाही. विशेष म्हणजे, या रेल्वेस्टेशनचे मास्टर निमकर यांच्यावर अमरावतीचा भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे मास्टरचे पदही डळमळीत झाले आहे. दुसरीकडे शकुंतला न आल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. शकुंतला सुरू होणार किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)४आधीच उपेक्षा भोगणाऱ्या शकुंतला रेल्वेकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. निक्सन कंपनीसोबतचा करार देखील आता संपण्याच्या बेतात आलेला आहे. मात्र त्यापूर्वीच उत्पन्नाचा स्रोत आटल्याने करार संपण्यापूर्वीच शकुंतलाची चाके थांबली आहे. गतवर्षी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. या रेल्वेचे ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर निर्णय होण्याची आशा आहे. यामुळे यवतमाळला फायदा होईल. शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. - भावना गवळीखासदार, यवतमाळ