शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

यवतमाळच्या फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:11 IST

हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला.

ठळक मुद्देकुटूंबिय घराबाहेर गेले असता साधला डाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील पांढरकवडा रोड स्थित गुलशननगर येथील रहिवासी व फळांचे व्यापारी मोहंमद हाफीज मोहंमद साहब यांच्याकडे रविवारी रात्री सात लाखांची धाडसी घरफोडी झाली. त्यात पाच लाख ५७ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.मोहंमद हाफीज यांचा आठवडी बाजार येथे फ्रुट मंडीमध्ये ठोक फळांचा व्यापार आहे. हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला. या धाडसी घरफोडीने अवधूतवाडी पोलिसांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची चोरट्याचा माग काढण्यासाठी मदत घेतली जात आहे. चोरटे त्याच परिसरातील असावे असा संशयही पोलीस व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Robberyचोरी