शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:45 IST

जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअपघात प्रवणस्थळांचा शोध : केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. परिवहन विभाग आणि बांधकाम विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात सातही ‘ब्लॅक स्पॉट’ वणी आणि राळेगाव तालुक्यात आढळून आले. आता या मार्गावरील अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना वरिष्ठ पातळीवर केल्या जाणार आहे.केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघातस्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले होते. सर्वेक्षण करून त्या ठिकाणी कुठल्या दुरूस्त्या केल्या म्हणजे अपघाताची तीव्रता कमी करता येईल, याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅक स्पॉट निवडताना किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूंचा सरासरी विचार करून त्या स्थळांना ब्लॅक स्पॉट घोषित करायचे की नाही, हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांच्या स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्या ठिकाणी झालेली जीवितहानी, याचा अभ्यास करून अशी स्थळे निवडण्यात आली आहे.या सर्वेक्षणात जिल्ह्यात करंजी-वणी-घुग्गुस मार्गावर तीन ब्लॅक स्पॉट आढळून आले. याशिवाय वणी तालुक्यातील शिरपूर येथे दोन, वडकी आणि वणी-वरोरा मार्गावर प्रत्येकी ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला. वणी परिसर वगळता जिल्ह्यात कुठेही ब्लॅक स्पॉटच्या निकषात बसेल, इतकी संख्या अपघातस्थळांवर नाही. या सात ब्लॅक स्पॉटवर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.गुगल मॅपवर इंडिकेशनप्रवास करताना बहुतांश चालकांकडून मोबाईलवर गुगल मॅपचा वापर केला जातो. अनेक वाहनांमध्ये जीपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅक स्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मीटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात त्यांना टाळता येणार आहे. यासाठी ब्लॅक स्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.