शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बोरगडीवासीयांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST

तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी येथील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता झाली.

ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी येथील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा होऊन कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.बोरगडी येथील ग्रामपंचायत सदस्य शरद ढेंबरे, गजानन शिंदे, कल्पना व्यवहारे, अब्दूल सलाम खान यांच्यासह बोरगडी येथील नारायण अंभोरे, पांडुरंग व्यवहारे, संजय पाईकराव, सुरेश विणकरे, सुभाष भालेराव, संतोष शेळके, देवानंद पुलाते, रवी ढगे, अशोक ढगे, रवी साखरे, संदीप ढोले यांनी १५ मार्चपासून साखळी उपोषणाला प्रारंभ केला होता. या उपोषणाची दखल घेत पंचायत समितीचे सभापती देवबा मस्के, उपसभापती गणेश पागिरे, जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, क्रांती कामारकर, गजानन उघडे, पंचायत समिती सदस्य भगवान भाकरे, देवेंद्र खडसे, किसन मळघणे, गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी भेट घेतली.उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी तीन दिवसात करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसे आदेश विस्तार अधिकारी पी.डी. चव्हाण, ईश्वरसिंग बघेल, कनिष्ठ अभियंता सुनील वेळूकर यांना दिले. या प्रकरणी योग्य चौकशी होऊन कारवाई न झाल्यास यवतमाळ येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.