शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ गांधीवादी बाळासाहेब सरोदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 14:45 IST

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत सुहास ऊर्फ बाळासाहेब आनंदराव सरोदे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत सुहास ऊर्फ बाळासाहेब आनंदराव सरोदे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. आयुष्यभर त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार जीवन प्रवास केला.स्वातंत्र्य व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी सर्वोदय चळवळ सुरू केली. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ व निसर्ग उपचार पध्दत सुरू केली. साने गुुरूजी यांनी आंतरभारती व आचार्यकुलाची स्थापन केली. या सर्वांमध्ये गांधी विचार हा समान धागा होता. या सर्व चळवळीत बाळासाहेब सरोदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक चळवळी गाजविल्या. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सरोदे यांनी स्वत:च्या मालकिची १०० एकर जमीन दान दिली. आयुष्यभर त्यांनी गांधी विचारांचा वारसा जपला. त्यानुसार आचारण केले. त्यामुळे त्यांची विदर्भात ज्येष्ठ गांंधीवादी विचारवंत म्हणून ओळख होती.सरोदे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत खादीच्या कपड्यांचाच वापर केला. यवतमाळात ते गेल्या २५ वर्षांपासून कस्तुरबा निसर्गोपचार योग महाविद्यालय चालवित होते. गुुरू वार, १६ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे अड. असिम आणि अमित ही दोन मुुले, अड. स्मिता सिंगलकर-सरोदे ही विवाहीत मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. बाळासाहेब सरोदे यांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्यांचे नेत्र स्विकारले. शुक्रवार, १७ जानेवारीला सकाळी १० वाजता त्यांच्या दर्डा नगरस्थित निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे. स्थानिक पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक