शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

संमेलनाच्या कार्यक्रमात ‘वऱ्हाड’ केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:54 IST

येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे.

ठळक मुद्दे९२ वे साहित्य संमेलन : परिसंवादांसह प्रतिभावंतांचाही होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत तीन महत्वाचे बदल केले आहे.संमेलनाध्यक्षांची निवडणूक टाळण्यात आली. याच संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाने आपला परिघ अधिक विस्तारला आहे. आतापर्यंत साहित्य महामंडळासोबत केवळ घटक संस्था, समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थाच काम करू शकत होत्या. मात्र आता महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून ‘सहयोगी संस्था’ हा नवा प्रकार सामील केला आहे. समाजात विविध समूहांचे विविध विचार प्रवाह आहेत. त्यांच्या-त्यांच्या सातित्यिक संस्थाही आहेत. या संस्थांना अखिल भारतीय साहित्य महामंडळासोबत काम करता येणार आहे. मात्र त्यासाठी घटक संस्थेची नाहरकत असावी आणि २५ वर्षांपासून ती संस्था नोंदणीकृत असावी.महामंडळाने केलेला तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही घेतले जाणार आहे. अगदी प्रारंभीच्या साहित्य संमेलनांना अधिवेशनाचेच स्वरूप होते. मात्र, काळ बदलत गेला, तशी संमेलनेही दिमाखदार सोहळ्यात रूपांतरित झाली. परंतु यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा अधिवेशने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही साहित्यविश्वासाठी मोठी देणच. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर (समता मैदान) ११, १२, १३ जानेवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाचा मुख्य केंद्र शेतकरी राहणार आहे. पहिलाच परिसंवाद शेतीविषयी होतोय. ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ असा विषय घेऊन शहरी साहित्यिकांनाच जाब विचारला जाणार आहे. त्याचवेळी ‘तत्वशील समाजघडणीसाठी आज महानुभाव, वारकरी, बसवेश्वर विचारांची गरज’ या परिसंवादात सर्वसमावेशक क्रांतीकारी विचारांचीच मांडणी होण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या परिसंवादात ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?’ हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.तांड्यांच्या, पोडांच्या व्यथा मांडणारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फारसे कधी चर्चेत न आलेले तांडे, पोड यवतमाळच्या संमेलनात लक्षवेधी ठरणार आहेत. बंजारा तांडे, कोलाम पोड यांचे जगणे, त्यातील अडचणी, तेथील वैशिष्ट्ये यावर विशेष चर्चा झडणार आहे. ‘कथा आणि व्यथा तांड्यांच्या पोडांच्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जनजीवन पहिल्यांदाच सारस्वतांच्या नोंदवहीत नोंदविले जाणार आहे. तर परिसरातील वऱ्हाडी बोलीचा सन्मान करण्यासाठी खास वऱ्हाडी कविसंमेलनही होणार आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार