शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; सूड भावनेने केलेली बदली रद्द करण्याची मागणी

By सुरेंद्र राऊत | Updated: September 12, 2022 18:41 IST

यवतमाळमध्ये मुख्याधिकाऱ्यांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला असून या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.

यवतमाळ : यवतमाळ येथील नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची राजकीय सूड भावानेतून बदली करण्यात येणार आहे. याची माहिती मिळताच मडावी यांच्यास समर्थनार्थ यवतमाळकर नागरिक आक्रमक झाले. मडावी यांची बदली करू नये त्यांनाच मुख्याधिकारी म्हणून ठेवावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी मोर्चा काढला. तिथे एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. तर एका युवकाने निषेध म्हणून मुंडण करून घेतले. काही युवकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

मुख्याधिकारी मडावी यांची बदली होणार याची चर्चा शहरभर सुरू झाली. समाज माध्यमावर तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर अनेकांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी दुपारी संविधान चौकातून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बदली रद्दची मागणी केली. यावेळी बाळासाहेब जयसिंगपुरे यांनी अंगावर पेट्रोल घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सतीश बोरकर या युवकाने मुंडण करून आपला निषेध नोंदविला. या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड यासह विविध सामाजिक राजकीय संघटनांनी सहभाग घेतला. कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा निघाला. त्यातसुद्धा माधुरी मडावी यांची बदली रद्दची मागणी करण्यात आली.

यवतमाळ नगरपरिषदेतील राजकीय वादामुळे शहराची बकाल अवस्था झाली होती. दैनंदिन कामही होत नव्हते. वर्षभरापूर्वी माधुरी मडावी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांनी येथे कर्मचारी संख्या कमी असतानाही योग्य नियोजन करत कामांचा धडाका लावला. शहर स्वच्छतेसह सौंदर्यीकरणाचे उपक्रम हाती घेतले. जनसामान्य नागरिकांचा पूर्णवेळ उपलब्ध असल्याने मडावी यांच्यावरचा विश्वास वाढत गेला. त्यांनी राबविलेल्या धडक मोहिमेमुळे शहर स्वच्छता झाली, उजाड उद्यान पूर्ववत होऊ लागली. शहरातील अनेक रस्त्यावरचे अतिक्रमण काढल्याने त्यांनी मोकळा श्वास घेतला. कधी नव्हे ते सफाई कामगार हातात झाडू घेऊन काम करू लागले. काम करावे लागत असल्याने मडावी यांना काहींनी चक्क धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र यालाही त्या जुमानल्या नाही. शहरातील आजपर्यंत न सुटलेली मोकाट वराहाची समस्यासुध्दा त्यांनी निकाली काढली. या सर्व कामांमुळे एक गट त्यांच्या विरोधात गेला़. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी धरून माधुरी मडावी यांची बदली करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याकडे शिफारस केली.

नगर परिषदेसमोर उपोषण माधुरी माडावी यांची बदली रद्द व्हावी यासाठी अशोक उर्फ गोलू भीमराव डेरे, हेमंत मुकींदराव कांबळे या युवकांनी उपोषण सुरू केले आहे. बदली आदेश रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

यवतमाळात पहिल्यांदा अधिकाऱ्यासाठी आंदोलन प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, यासाठी यवतमाळ शहरात पहिल्यांदाच सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. तीव्र शब्दात स्थानिक लोकप्रतिनिधीचा निषेध केला जात आहे. केवळ राजकीय सुडातून चांगल्या अधिकाऱ्याची बदली केली जात असल्याचा आरोप होत आहे. ही यवतमाळच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळagitationआंदोलन