शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोलिसांचे गोपनीय अहवाल आता निरीक्षकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 13:13 IST

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरातील पोलीस शिपाई ते सहायक फौजदारापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाबाबत (शिट रिमार्क) महासंचालक कार्यालयाने नवे धोरण जारी केले आहे. त्यानुसार आता पोलीस शिपाई, पोलीस नाईक या कर्मचाऱ्यांचे अहवाल संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिहिणार आहेत.शिपाई व नाईकच्या अहवालाचे पुनर्विलोकन संबंधित पोलीस उपअधीक्षक-सहायक आयुक्तांकडे राहणार ...

ठळक मुद्देपुनर्विलोकन उपअधीक्षकांकडे‘शीट रिमार्क’ वित्तीय वर्षानुसार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरातील पोलीस शिपाई ते सहायक फौजदारापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाबाबत (शिट रिमार्क) महासंचालक कार्यालयाने नवे धोरण जारी केले आहे. त्यानुसार आता पोलीस शिपाई, पोलीस नाईक या कर्मचाऱ्यांचे अहवाल संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिहिणार आहेत.शिपाई व नाईकच्या अहवालाचे पुनर्विलोकन संबंधित पोलीस उपअधीक्षक-सहायक आयुक्तांकडे राहणार आहे. जेथे निरीक्षकापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल तेथील पोलीस शिपाई व पोलीस नाईक यांचे शीट रिमार्क, प्रतिवेदन व पुनर्विलोकन उपअधीक्षक करणार आहेत.जमादार-एएसआय एसपींकडेपोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक यांचे गोपनीय अहवाल, प्रतिवेदन व पुनर्विलोकन हे पोलीस अधीक्षक अथवा अपर अधीक्षक करणार आहेत. आतापर्यंत दहा वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल उपअधीक्षक तर दहा वर्षावरील सेवा झालेल्यांचे अहवाल अधीक्षक लिहित होते. त्यासाठी खास पेशी घेतली जात होती.‘मार्च एन्डिंग’ची मर्यादाआतापर्यंत एप्रिलच्या ३० तारखेपर्यंत गोपनीय अहवालाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे बंधन होते. परंतु यापुढे वित्तीय वर्षानुसार अर्थात १ एप्रिल ते ३१ मार्च या काळात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) राजेंद्र सिंग यांनी या संबंधीचे आदेश जारी केले आहेत.वाचायला द्या, स्वाक्षरी घ्यागोपनीय अहवाल, पुनर्विलोकन संबंधित कर्मचाऱ्याला माहीत करून देणे बंधनकारक असून ते प्रलंबित राहणार नाही, याची जबाबदारी घटक प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. गोपनीय अहवाल संबंधित कर्मचाऱ्याला समक्षच वाचायला देऊन स्वाक्षरी घ्यावी, असेही सुचविण्यात आले आहे.अहवाल प्रलंबित, पदोन्नतीत अडचणीपोलीस कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यस्ततेमुळे कित्येकांचे अहवालच लिहिले नाहीत तर काही अहवाल पुनर्विलोकनासाठी प्रलंबित आहेत. राज्यभरात अशी शेकडो प्रकरणे महासंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आली आहेत. गोपनीय अहवाल (शिट रिमार्क) न लिहिल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवानिवृत्त, बक्षीस, सन्मान चिन्ह, सेवापट तपासणी व अन्य प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी निर्माण झाल्या. ही गैरसोय टाळण्यासाठीच शिट रिमार्कच्या अधिकाराचे आता विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस